Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाळू तरुणाचं भयंकर कांड! लग्न जमण्यासाठी पोलिस झाल्याचे खुलेआम पोस्टर; आता पोलिसांनी…

'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग' या मराठी म्हणीप्रमाणेच नऱ्हे भागातील एका लग्नाळू तरुणाचे एक भयंकर कांड समोर आले आहे. त्याच्या या कृत्याने पुर्ण पुण्यात खमंग चर्चा घडवून आणली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 21, 2026 | 06:28 PM
लग्नाळू तरुणाचं भयंकर कांड! लग्न जमण्यासाठी पोलिस झाल्याचे खुलेआम पोस्टर; आता पोलिसांनी...

लग्नाळू तरुणाचं भयंकर कांड! लग्न जमण्यासाठी पोलिस झाल्याचे खुलेआम पोस्टर; आता पोलिसांनी...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ‘उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग’ या मराठी म्हणीप्रमाणेच नऱ्हे भागातील एका लग्नाळू तरुणाचे एक भयंकर कांड समोर आले आहे. त्याच्या या कृत्याने पुर्ण पुण्यात खमंग चर्चा घडवून आणली आहे. कारणही तसंच आहे, एका २६ वर्षीय तरुणाने लग्न व्हावे, यासाठी पोलिस झाल्याचा बनाव केला आणि अभिनंदनाचे फ्लेक्सही झळकवले. व्हॉट्सअपसह सोशल मिडीयावर देखील स्टेट्स ठेवले. पण, त्याचा बनाव अन् त्याच्या आनंदाला काही वेळातच फुलस्टॉप मिळाला. आपल्या भागातील ‘गरीब घरचा पोरगा’ पोलिस झाल्याने नऱ्हे पोलिस त्याला अभिनंदन अन् सत्कार करण्यासाठी त्याच्या घरी गेले खरे पण, शेवटी या तरुणावरच गुन्हा नोंदवला गेल्याची घटना घडली आहे.

 

ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा. नऱ्हे) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचं झाल अस की, ऋषीकेश हा सिंहगड रोडवरील नऱ्हे परिसरात राहतो. तो मुळचा सोलापूर जिल्हयातील आहे. पण, जन्मापासून पुण्यात आहे. त्याची आई आणि एक विवाहित बहिण असा परिवार आहे. तो भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. आईही कामे करते. त्याला लग्न करायचे होते. तो लग्नासाठी उतावळाच झाला होता, असे येथील नागरिक सांगतात.

दरम्यान, लग्नाची परिस्थिती पाहता, चांगला व्यावसाय किंवा सरकारी नोकरी असल्यास तात्काळ मुलगी मिळते असाच काही अनुभव तरुणांना आहे. ऋषीकेशही या फंदात अडकला. त्याने जिद्दीने नोकरी मिळवणे सोडून बनावाने ‘चोर’मार्ग स्विकरला अन् तिथेच तो फसला.

चक्कन ऋषीकेशने नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत आपण पोलिस झाल्याचा बनाव केला. तोही पुणे पोलिस दलात. त्याने शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या गेटवर उभा राहून तिथे फोटो सेशन देखील केले व “मी पोलिस झालो” असे म्हणत नऱ्हे परिसरातत पेढे वाटले. बॅनरबाजी देखील केली. आता बॅनर अन् पेढे वाटप झाल्यानंतर ही ‘बातमी’ नऱ्हे पोलिसांना देखील समजली. मग, पोलिस आपल्या भागातलं पोरग पोलिस झाल्याने त्याचा सत्कार करण्यासाठी त्याच्या घरी पोहचले व त्याचे अभिनंदन केले. मात्र, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आणि ऋषीकेशच बिंग फुटलं.

अतिउत्साह नडला, गुन्हा दाखल झाला…

कोणताही अधिकृत अधिकार नसताना पोलिस असल्याचं भासवणं आणि महाराष्ट्र पोलिसांच्या चिन्हाचा गैरवापर करणं ऋषिकेशला अंगलट आलं. तो सार्वजनिक सेवक नसताना त्याने तसे भासवून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल त्याच्यावर बीएनएस कलम २०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “पोलिस भरती होणं हे सन्मानाचं काम आहे, पण त्यासाठी कष्ट करावे लागतात. अशा प्रकारे खोट्या प्रसिद्धीच्या जोरावर वर्दीचा अपमान करणं चुकीचं आहे,” असं मत नऱ्हे पोलिसांनी व्यक्त केलं आहे.

फक्त लग्नासाठी ऋषीकेशचे कांड

ऋषीकेशने हा सर्व प्रकार लग्न व्हाव यासाठीच केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला वाटले की, पोलिस झाल्याच्या बातमीने आपल्याला मुलगी मिळेल आणि आपले लग्न होईल. त्यासाठी त्याने आईसह सर्वांना खोटे सांगत हा बनाव रचला होता.

Web Title: A young man from pune pretended to be a policeman to get married

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Pune Crime
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

PCMC News:  एमआयडीसी परिसरातील मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
1

PCMC News:  एमआयडीसी परिसरातील मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पुण्यात सरकारी ‘कुलूप’! बेमुदत संपाने शासकीय यंत्रणा ठप्प, कर्मचाऱ्यांचा एल्गार
2

पुण्यात सरकारी ‘कुलूप’! बेमुदत संपाने शासकीय यंत्रणा ठप्प, कर्मचाऱ्यांचा एल्गार

Pune Crime News : व्यवहार पुर्ण न करता फ्लॅटचा ताबा घेतला; दाम्पत्यावर पुण्यात गुन्हा दाखल
3

Pune Crime News : व्यवहार पुर्ण न करता फ्लॅटचा ताबा घेतला; दाम्पत्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?
4

पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.