
कोल्हापूरच्या आकुर्डेत गोठ्याला भीषण आग; तब्बल 30 लाखांचे नुकसान
गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले असून, घर व गोठ्यातील प्रापंचिक साहित्य, जीप, पॉवर ट्रेलर, मारुती व्हॅन तसेच मोठ्या प्रमाणावर साठवलेले गवत, पिंजर जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे जनावरे सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
हरिजन वस्तीजवळील अशोक साताप्पा भांदिगरे यांच्या गोठ्याने अचानक पेट घेतल्याचे पहाटे काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. ग्रामस्थांनी तातडीने मदतीला धाव घेत पाणी व उपलब्ध साधनांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. बिद्री कारखान्याची टँकरही घटनास्थळी दाखल करण्यात आली; मात्र, तोपर्यंत संपूर्ण घर व त्यातील साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले होते. बुधवारी (दि.7) मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली.
दरम्यान, ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता गोठ्यातील जनावरे सुरक्षित बाहेर काढली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी स्मिता भोपळे यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच डॉ. रवींद्र पारकर, के. एम. कुपटे, नामदेव कुपटे, कृष्णात पाटील, आनंदराव जाधव, ग्रामसेवक श्रीधर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या दुर्घटनेमुळे भांदिगरे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
हेदेखील वाचा : Manila Fire : फिलीपिन्सची राजधानी मनिला भीषण आगीत जळून खाक! 500 हून अधिक कुटुंबे बेघर; गरीब वस्त्यांमध्ये ‘जाळपोळ’ सामान्य का?
पिंपरीतही लागली होती आग
दुसऱ्या एका घटनेत, पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील प्राईम स्क्वेअर या बहुमजली कमर्शियल इमारतीतील चौथ्या मजल्यावरील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये दुपारी सुमारे पावणे तीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पिंपरी मुख्य केंद्रातून २, थेरगाव उपकेंद्रातून १ आणि नेहरूनगर केंद्रातून १ अशा चार अग्निशमन पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले.