Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: तांबेवाडी तांड्यावर छापा टाकत ३५ टन अवैध लाकूड जप्त; १२ हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

Solapur News- सदरची यशस्वी कारवाई सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बार्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बडे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 06, 2026 | 07:25 PM
Solapur News: तांबेवाडी तांड्यावर छापा टाकत ३५ टन अवैध लाकूड जप्त; १२ हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
Follow Us
Follow Us:

Solapur Forest Department raid मौजे तांबेवाडी तांडा येथे वनविभागाने धडक कारवाई करत सुमारे ३० ते ३५ टन अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, वनविभागाने १२ ते १३ शेतकऱ्यांवर ‘महाराष्ट्र #वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४’ अंतर्गत वन गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी वनविभागाला तांबेवाडी तांडा येथील काही शेतकऱ्यांनी आपल्या मालकी क्षेत्रात आणि घराच्या परिसरात विनापरवाना वृक्षतोड केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला.

उपमुख्यमंत्र्यांनी केली बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

या छाप्यात शेतकऱ्यांनी कायदेशीर परवानगी न घेता लिंब, आंबा, चिंच यांसारख्या विविध प्रजातींच्या वृक्षांची बेकायदेशीर तोड करून साठवून ठेवलेला सुमारे ३० ते ३५ टन लाकडाचा साठा आढळून आला. वनविभागाने हा सर्व माल जप्त केला असून याप्रकरणी पुढील तपास वेगाने सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

सदरची यशस्वी कारवाई सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बार्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बडे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. या कारवाईत वनपाल डी. बी. शिदोडकर, ए. आर. पिरजादे, वनरक्षक बालाजी धुमाळ, सचिन पुरी, करामत अली शेख, सुलतान शेख, पूजा खेणे, वनमजूर आशा बी अन्सारी तसेच वाहन चालक सिद्धेश्वर जाधव आणि शाबाज मुल्ला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला निर्देश

वनविभागाचे नागरिकांना #आवाहन

“#अवैध वृक्षतोड, बेकायदेशीर लाकूड वाहतूक किंवा वन्यजीवांची शिकार करणे हा गंभीर वनगुन्हा आहे. कोणत्याही नागरिकाने अशा प्रकारची कृत्ये करू नयेत. आपल्या परिसरात असा कोणताही बेकायदेशीर प्रकार आढळून आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे,” असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

 

Web Title: Massive raid at tambewadi tanda forest officials confiscate illegal wood worth tons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Barshi
  • Forest Department
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
1

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!
2

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी
3

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी

Palghar News : आदिवासींच्या जमिनीचा 7/12 उताऱ्यावर हक्क कधी? Vivek Pandit आक्रमक; पालघरमध्ये हजारो आदिवासी रस्त्यावर उतरणार!
4

Palghar News : आदिवासींच्या जमिनीचा 7/12 उताऱ्यावर हक्क कधी? Vivek Pandit आक्रमक; पालघरमध्ये हजारो आदिवासी रस्त्यावर उतरणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.