Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर हादरले ! कारमध्ये गंधकाचा भीषण स्फोट; तरुणाच्या पायाला गंभीर इजा, परिसरात एकच खळबळ

अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, केदारनाथ यांच्या उजव्या पायाच्या ठिकऱ्या उडाल्या आणि अंगावरील कपडेही फाटले. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 12, 2026 | 08:04 AM
सोलापूर हादरले ! कारमध्ये गंधकाचा भीषण स्फोट; तरुणाच्या पायाला गंभीर इजा, परिसरात एकच खळबळ

सोलापूर हादरले ! कारमध्ये गंधकाचा भीषण स्फोट; तरुणाच्या पायाला गंभीर इजा, परिसरात एकच खळबळ

Follow Us
Follow Us:

सोलापूर : शहरात वर्दळीच्या पापय्या तालीम परिसरातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सबाहेर सोमवारी (दि.११) सायंकाळी गंधकाचा भीषण स्फोट झाला. कारच्या डिक्कीत रबरी काडतूस आणि फटाक्यांचे साहित्य ठेवताना हा अपघात घडला असून, यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ​या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

केदारनाथ छत्रे (रा. इंदिरा नगर, विजापूर रोड) असे यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. केदारनाथ हे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या स्विफ्ट डिझायर कारच्या डिक्कीत गंधक भरलेले साहित्य ठेवत होते. यावेळी अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, केदारनाथ यांच्या उजव्या पायाच्या ठिकऱ्या उडाल्या आणि अंगावरील कपडेही फाटले. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. ​घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गौहर हसन, विजय कबाडे, वरिष्ठ निरीक्षक तानाजी दराडे यांच्यासह बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली.

हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत पतीचा हैवानपणा ! नातवांसमोर पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; काय घडलं नेमकं?

दरम्यान, स्फोट झाला त्या कारजवळच सहारा गन हाऊस नावाचे दुकान असून, या दुकानात लायसन्सची गरज नसलेल्या बंदुका आणि छर्रे मिळतात. जखमी केदारनाथ तेथेच कामाला आहे. गंधकाचे साहित्य नेताना हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जखमीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी; तरीही वेळेवर नाही उपस्थिती

स्फोटानंतर जखमी तरुण रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडून होता. हाकेच्या अंतरावर नवी वेस पोलीस चौकी असूनही पोलीस वेळेवर पोहोचले नाहीत. अखेर रुग्णवाहिकेची वाट न पाहता सामाजिक कार्यकर्ते राज सलगर यांनी जखमीला स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेले, ज्यामुळे पोलिसांच्या उदासीनतेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई

दुसऱ्या एका घटनेत,  पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरातून अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलांना पकडल्याचे सातत्याने समोर येत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरात वास्तव्यास राहत काही महिला देहव्यापार करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. अशातच आता  बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात पोलिसांनी पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवत पाच बांगलादेशी महिलांना पकडले आहे. सातत्याने या भागातून बांगलादेशी महिलांना महिलांना पकडून कारवाई केली असून, गेल्या काही दिवसांमधील ही चौथी कारवाई आहे.

Web Title: Massive sulfur explosion in car young man sustains severe leg injuries incident in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • Blast Case
  • Solapur News

संबंधित बातम्या

Bolivia Blast Update : बोलिव्हियातील लष्करी तळावर दुहेरी स्फोट; ८१ जखमी, ७ बेपत्ता
1

Bolivia Blast Update : बोलिव्हियातील लष्करी तळावर दुहेरी स्फोट; ८१ जखमी, ७ बेपत्ता

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पिके संकटात, रब्बीच्या पेरणीवरही टांगती तलवार
2

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पिके संकटात, रब्बीच्या पेरणीवरही टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.