Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?

Matheran News : माथेरान डोंगराच्या अगदी समोर असलेल्या ढाक चा डोंगर खऱ्या अर्थाने वनराईने नटलेला प्रदेशाला पूर्वी मिनी माथेरान समजले जात होते.  20 वर्षात मिनी माथेरान तयार होणार असे सांगितले जात होते .तेथे आता टोरंट कंपनी वीज प्रकल्प उभारणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2026 | 04:33 PM
matheran news

matheran news

Follow Us
Follow Us:
  • विकासाच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ?
  • माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?
माथेरान/संतोष पेरणे : माथेरान डोंगराच्या अगदी समोर असलेल्या ढाक चा डोंगर खऱ्या अर्थाने वनराईने नटलेला प्रदेशाला पूर्वी मिनी माथेरान समजले जात होते.  20 वर्षात मिनी माथेरान तयार होणार असे सांगितले जात होते .तेथे आता टोरंट कंपनी वीज प्रकल्प उभारणार आहे. माथेरानचा भाग असलेला आणि माथेरान इको सेन्सेटिव्ह झोन प्रदेशातील गार्बेट मध्ये सिमेंटचे जंगल उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे.पर्यटनाच्या नावाखाली संरक्षित वनाचे सर्व कायदे मोडून मिनी माथेरान बनववायचं आणि पैसे कमविण्याचा डाव आहे. दरम्यान,गार्बेटवाडीमध्ये केवळ तीन कुटुंबांसाठी सात कोटींचा रस्ता बनविला जात असून वन विभागाचे नियम पायदळी तुडवून आदिवासी विभागाचा निधी बिगर आदिकवासी परिसरात खर्च केला जात आहे.

माथेरानच्या डोंगर रांगेत गार्बेटवाडी येथे धनगर लोकांची वस्ती वसली आहे. माथेरान हे कर्जत तालुक्यात असून गार्बेट वाडी ही वस्ती खालापूर तालुक्यात आहे.तर गार्बेट वाडीमध्ये जाणारा संपूर्ण रस्ता कर्जत तालुक्यातून जात असून केवळ 25 मीटर रस्ता हा खालापूर तालुका हद्दीत आहे. या ठिकाणी वन विभागाचे देखील वेगवेगळे विभाग असून कर्जत पश्चिममध्ये गार्बेट वाडीकडे जाणारा रास्ता जातो तर काही रस्ता माथेरान वन विभागाच्या अखत्यारीत आहे.

गार्बेट वाडीच्या आसपास आणि आजूबाजूला असलेली जमीन हि वन विभागाची जमीन आहे. त्यातही वन विभागामध्ये सर्वात महत्वाची समजली जाणारे संरक्षित वन म्हणून माथेरान परिसराची नोंद आहे. त्याचवेळी 2001 मध्ये माथेरानला इको सेन्सेटिव्ह झोन लावण्यात आल्यानंतर इको झोन परिसरात सुरुंग स्फोट,सिमेंटची नवीन कामे आणि खोदकाम करण्यास पूर्णपणे बंदी आहे.असे असताना रस्ता बनविण्यासाठी झाडे तोडण्यात आली,खोदकाम करण्यात आले आणि हे सर्व बेकायदा सुरु असून वन विभागाने आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 3/2 मधून मंजूर केलेला प्रस्ताव संशयास्पद असल्याचे आदिवासी समाज बोलू लागला आहे.

Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय

आदिवासी विभागाचा निधी बिगर आदिवासी वस्तीसाठी?

गार्बेट वाडीमध्ये सध्या राहणारे तीन कुटुंब यांच्यासाठी करोडो रुपयांचा निधी मधून रस्ता बनविला जात आहे.गार्बेट वाडीमध्ये धनगर समाजाची वस्ती असून धनगर समाज ओबोसी प्रव्रर्गात मोडतो. असे असताना आदिवासी विकास विभागाचा निधी ओबीसी प्रवर्गाकडे वळवून आदिवासी भागाच्या विकासाला खीळ बसली आहे.तब्बल सात कोटींचं निधी वन जमिनीमधून रस्ता करण्यासाठी आदिवासी भागाच्या विकासासाठी खर्च करण्याचा घाट हा आदिवासी विभागाची फसवणूक असून राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आदिवासी समाजाकडून केली जात आहे.

मिनी माथेरानचे स्वप्न

माथेरान डोंगरात राहणारे गार्बेटवाडीमधील लोक हे केवळ माथेरानकर म्हणूनच एवढी वर्षे राहिले आहेत.त्यांच्या वन हक्क कायद्याने मिळालेल्या जमिनीवर वावर्ले ग्रामपंचायतमधील नेत्यांचा डोळा असून त्या जमिनी आपल्याकडे अधिक पैसे देऊन घ्यायच्या आणि तेथे मिनी माथेरान उभारायचे? असा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे.

ब्रिटिशांनी माथेरानची निर्मिती केली त्यावेळी गार्बेट हा देखील माथेरानचा भाग राहिला होता आणि आजही गार्बेट वाडी मधील 90 टक्के लोक माथेरान गावात वास्तव्यास आहेत.त्यांची नाळ जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानशी जोडलेली आहे.त्यामुळे वावर्ले भागातील नेत्यांचे आपल्या वरच्या नेत्यांसाठी मिनी माथेरान फुलवण्याचे स्वप्न वन जमिनीवर कसे शक्य होणार असा प्रश्न माथेरानकरांना पडलं आहे. माथेरानच्या इको झोन आणि वन विभागाच्या असंरक्षित वन क्षेत्रातील गार्बेट परिसरात कायद्याच्या चिंधड्या उडवून रस्ता काँक्रीटचा बनविला आहे. त्यामुळे वन कायद्याच्या अशाच चिंधड्या उडवून काँक्रीटचे जंगल गार्बेटमध्ये उभे करण्याचा डाव दिसून येत आहे.

Matheran News : रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय; डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल

दीडशे वर्षांपूर्वी शोधून काढलेल्या माथेरानच्या अगदी समोर भीमाशंकर अभयारण्याच्या रांगेत असलेलया ढाक डोंगर आहे. तेथे शिवकालीन अवशेष असून तेथील जंगल हे घनदाट असल्याने प्रति माथेरान मधील 50 वारसापूर्वी याची नोंद होती. त्या ठिकाणी घनदाट जंगलाची जमीन टोरंट पॉवर कंपनीच्या घशात गेली आहे. त्यामुळे तेथे होणारे मिनी माथेरान किंवा प्रति माथेरान माथेरानच्या गार्बेटमध्ये उभारणी आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा गोरख धंदा सुरु होण्याची शक्यता आहे.

Web Title: Matheran news attempt to grab land under the name of mini what is really going on in matheran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Marathi News
  • matheran news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.