Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो मात्र याच तालुक्यामध्ये माथेरान हे जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे.या थंड हवेचे ठिकाणे विविध देशातून तसेच विविध राज्यातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात. मात्र याच पर्यटनाच्या ठिकाणी माथेरानच्या किंवा कर्जत तालुक्यामध्ये असणारे आदिवासी बांधव जंगलामध्ये जाऊन जंगलचा रानमेवा गोळा करून माथेरान मध्ये विकण्यासाठी आणतात. त्याचवेळी गवतापासून विविध प्रकाराच्या वस्तू बनवून आणतात.या हस्तकला वस्तूंना पर्यटकांकडून प्रचंड मागणी असते. हे आदिवासी लोक माथेरान मार्केटमधील करंजा परिसर पासून कपाडिया मार्केट पर्यंत व्यवसाय करीत असतात.
आदिवासी लोक आपले स्टॉल लावून आपला व्यवसाय करतात एवढेच नव्हे तर आदिवासी लोक जंगलात जाऊन विविध प्रकारचे गवत गोळा करून या गवताचे बुके बनवून हे पर्यटकांना विकत असतात.हे गावापासून बनवलेल्या फुलदाण्या मागील काही वर्षात विशेष आकर्षक बनल्या आहेत.त्याचवेळी जंगलामध्ये असणारा रानमेवा करवंदे जांभळे आंबे आणि विविध प्रकारची फळे या ठिकाणी विकण्यासाठी आणतात हे आदिवासी लोकप्रिय आणि पिढ्या माथेरान बाजारपेठ मध्ये असलेल्या कारंजाच्या आजूबाजूला हे आपले स्टॉल लावत आहेत. माथेरान गिरीस्थान नगर परिषदेकडून आदिवासी लोकांची स्टॉल उठवले जात आहेत.
Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक
मात्र या ठिकाणी असलेल्या ज्या जुन्या झाडाच्या आजूबाजूला बसून व्यवसाय करतात.तेथे सुशोभीकरणाच्या नावाखाली पर्यटकांना बसण्यासाठी ओटे बनवले जात आहेत.त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या आदिवासी लोकांना माथेरान मध्ये येण्यासाठी डोंगर चढून यावे लागते आणि नंतर पुन्हा सायंकाळी डोंगर उतरून घरी जावे लागते.असे कष्टप्रद व्यवसाय करणाऱ्या आदिवासी लोकांचा व्यवसाय नगरपरिषदेच्या या निर्णयामुळे हिरावला जाणार आहे.किमान 70-80वर्षे हे आदिवासी लोक तेथे बसून व्यवसाय करतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.मात्र पालिकेच्या भूमिकेमुळे माथेरान शहरात व्यवसाय करणाऱ्या आदिवासी लोकांची रोजीरोटी संकटात आली आहे.
जैतू पारधी, आदिवासी कार्यकर्ते
माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कारण त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाच्या आडोशाला हे आदिवासी लोक पिढ्यान पिढ्या आपला व्यवसाय करत होते.मात्र हा व्यवसाय हे जंगलामध्ये असणारा रानमेवा तसेच गवतापासून विविध प्रकारे डिझाईन बनवणे गुच्छ बनवणे हे सर्व या ठिकाणी विक्री करत होते.मात्र माथेरान गिरीस्थान परिषदेचे नगरसेवक यांच्याकडून ज्या झाडाखाली आदिवासी लोक आपले रानमेवा किंवा इतर व्यवसाय करत आहेत,त्यांचा व्यवसाय हिरावला जाणार आहे. लोकांचा उदरनिर्वाह याच धंद्यावर चालत होता त्यामुळे आता या लोकांचा उदरनिर्वाह उघड्यावर येण्याची शक्यता आहे.माथेरानचे जडणघडणीत एक हिस्सा असलेल्या डोंगरात राहणाऱ्या आदिवासींना माथेरान मधील हकालपट्टी करण्याचे षडयंत्र आहे काय? असे आम्हाला वाटत आहे.






