कर्जत/संतोष पेरणे : माथेरानमध्ये पर्यटकांचा वाढता ओघ पाहता सोयीसुविधांसाठी ई रिक्षा सुरु करण्यात आल्या आहेत. सध्या पावसामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता पावसामुळे झाड उन्मळून पडलं. हे झाड रिक्षावर पडलं असल्याने यामध्ये तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यावेळी रिक्षा मध्ये प्रवास करीत असलेल्या दोन प्रवाशांना आणि इ रिक्षाचालक जखमी झाले.माथेरान शहरात पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जातात.सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत माथेरान शहरात पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जातात.त्यात सकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांना इ रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातात.या इ रिक्षा यांच्या माध्यमातून दहा क्रमांक असलेली ई रिक्षा चालक प्रशांत गायकवाड हे दस्तुरी येथील थांब्यावर प्रवाशांची वाट पाहत उभे होते.
माथेरान गावातील व्यवसायिक मनोज जांभळे,तसेच वनिता चव्हाण आणि पंचि राठोड असे तिघे यांना घेऊन प्रशांत गायकवाड माथेरान शहराकडे जायला निघाले.नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनचा अमन लॉज येथील स्थानकातून पुढे काळोखी भागातून जात असताना तेथील जुने आणि मोठे झाड हे चालत्या ई रिक्षांवर कोसळले.त्या भागातील दस्तुरी ते माथेरान हुतात्मा स्मारक या टप्प्यातील रस्ता तीव्र चढाव असलेला असल्याने इ रिक्षाचा वेग देखील कमी होता.मात्र कोसळलेले झाडं हे मोठे असल्याने इ रिक्षा मधून प्रवास करणारे प्रवाशांचे अंगावर कोसळले.
इ रिक्षा वर कोसळलेले झाड आणि त्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षा मधून प्रवास करणारे तिघे जखमी झाले आहेत.त्यावेळी तेथून जाणारे माथेरान शहरातील नागरिक शहर जोशी,महापुले यांनी त्या अपघातात जखमी झालेल्या तिन्ही व्यक्तींना माथेरान पालिकेच्या बी जे रुग्णालयात उपचारासाठी नेले.तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तिन्ही जखमींवर उपचार सुरू केले.त्या अपघातात जखमी झालेले मनोज जांभळे यांच्या खांद्याला आणि डोक्याला मार लागलेला असल्याने त्यांना माथेरान बाहेर उपचारासाठी पाठवून देण्यात आले.या अपघातात जखमी झालेले प्रशांत गायकवाड आणि पंची राठोड यांच्या पाठीवर आणि खांद्यावर झाड कोसळल्याने मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.झाड कोसळून नुकसान होण्याची दुसरी घटना.२ जुलै रोजी दोन इ रिक्षा यांच्यावर चार्जिंग स्टेशन वर झाड कोसळले होते.त्यावेळी दोन इ रिक्षा यांचे मोठे नुकसान झाले होते.
दस्तुरी ई रिक्षा थांब्यावरून माथेरानच्या दिशेला येणाऱ्या ई रिक्षावर जांभूळ या जातीचे मोठे झाड मुळासकट पडल्याने मोठी दुर्घटना घडली असून या ई रिक्षा मध्ये प्रवास करत असलेल्या पंची बाई राठोड वय 60 वर्षे, वनिता चव्हाण तसेच मनोज जांभळे असे तीन प्रवासी तसेच चालक प्रशांत गायकवाड हे जखमी झाले असून यामध्ये पंची बाई राठोड यांच्या खांद्याला व पाठणीला तसेच मनोज जांभळे यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याचे समजते यावेळी मागून येत असलेल्या रिक्षा मधील प्रवासी सागर जोशी व अब्दुल महापुळे यांनी क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य करत सर्व प्रवाशांना अपघात ग्रस्त ई रीक्षातून बाहेर काढले व ते प्रवास करत असलेल्या रिक्षातून माथेरान नगर परिषदेच्या बि.जे. हॉस्पिटल येथे पाठवले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तीन प्रवाशांना अधिक उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.