Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : मध्य रेल्वेच्या विकासकामाला गती ; शेलू रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या लोकलसाठी स्थानकाचे विस्तारीकरण

मध्य रेल्वे वरील मेन लाइन मार्गावर असलेल्या शेलू रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण सुरू झाले आहे.आगामी काळात कर्जत पर्यंत 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असल्याने स्थानकाचे विस्तारीकरण केले जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 13, 2026 | 02:10 PM
Karjat News : मध्य रेल्वेच्या विकासकामाला गती ; शेलू रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या लोकलसाठी स्थानकाचे विस्तारीकरण
Follow Us
Close
Follow Us:
  • मध्य रेल्वेच्या विकासकामाला गती ;
  • शेलू रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या लोकलसाठी स्थानकाचे विस्तारीकरण
कर्जत/संतोष पेरणे : मध्य रेल्वे वरील मेन लाइन मार्गावर असलेल्या शेलू रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण सुरू झाले आहे.आगामी काळात कर्जत पर्यंत 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असल्याने स्थानकाचे विस्तारीकरण केले जात आहे.मात्र या भागातून लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून महिला लोकल सुरू करण्याची मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे.

मध्य रेल्वे वर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ताण वाढत आहे.त्यामुळे पूर्वी असलेल्या नऊ डब्यांच्या लोकल 12  डब्यांच्या सुरू करण्यात आल्या,मात्र तरीदेखील सकाळ आणि संध्याकाळचे वेळी प्रवाशांच्या गर्दीमुळे 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू झाल्या आहेत. कर्जत दिशेकडे अद्याप 15 डब्यांच्या उपनगरी लोकल चालविल्या जात नाहीत.त्यामुळे प्रवाशांची गर्दी आटोक्यात येण्यात अडचणी येत आहेत.ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे कडून कर्जत दिशेकडून शेलू स्थानकात फलाटाचे विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.तेथे मुंबई दिशेकडे दोन्ही बाजूला फलाटाची लांबी वाढवली जात आहे.त्यामुळे आगामी काळात 15 डब्यांची उपनगरीय लोकल सुरू होण्याची शक्यता आहे. शेलू या साधारण 1999 चे काळात बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकात पूर्वी स्थानिक लोकांचा लोकल प्रवास असायचा.आता या परिसरात मोठ्या प्रमाणात चाळ संस्कृती आणि इमारती उभ्या राहिल्या असून तेथे राहणारे लोक यांची संख्या हजारोने वाढली आहे.

Panvel Municipal Corporation: विकसित महाराष्ट्र २०४७ साठी पनवेल ग्रोथ हब; आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधानसभेत मत

स्थानिक पातळीवर राहायला आलेले लोकांची संख्या वाढली आहे.त्यामुळे उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे.ही बाब लक्षात घेऊन सध्याच्या लोकल गाड्यांमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमुळे उपनगरीय लोकल तुडुंब भरून ये जा करीत असतात.याचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना बसत असून महिला प्रवाशांना बदलापूर पासून पुढे प्रत्येक स्थानकात उतरण्याची कसरत करावी लागत आहे.त्यातून सर्वाधिक वाद हे महिला डब्यांमध्ये होत असल्याचे मागील काही वर्षात दिसून आले आहे.ही लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबई पासून कर्जत खोपोली मार्गावर आता महिला लोकल सोडाव्या अशी मागणी जोर धरत आहे.महिलांसाठी विशेष गाडी सुरू केल्यास प्रवाशांचे हाल थांबतील असा आशावाद शेलू येथील महिला कार्यकर्त्या रेखा हिरेमठ यांना आहे.महिला बचतगट चळवळ चालवणाऱ्या रेखा हिरेमठ यांनी रेल्वे प्रशासनाला फलाटाची लांबी वाढवून आणि 15 डब्यांची गाडी सुरू करून प्रश्न सुटणार नाही तर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचे महिला लोकल सुरू करावी अशी मागणी केली आहे.

Karjat News: कर्जतमध्ये प्रवृत्ती, विकृती विरुद्ध परिवर्तन, सुनील तटकरे यांची माहिती

Web Title: Karjat news central railway development work accelerates expansion of station for 15 coach local at shelu railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • central railway
  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News :  नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात; नेरळ गावकऱ्यांच्या रहदारीचा प्रश्न आता सुटणार
1

Karjat News : नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात; नेरळ गावकऱ्यांच्या रहदारीचा प्रश्न आता सुटणार

Raigad : अखेर रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचा फॉर्म्युला ठरला
2

Raigad : अखेर रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचा फॉर्म्युला ठरला

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद
3

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat News : शिवजयंतीचा उत्साह शिगेला ; 70 किलोमीटर प्रवास करून शिवज्योतीचं आगमन
4

Karjat News : शिवजयंतीचा उत्साह शिगेला ; 70 किलोमीटर प्रवास करून शिवज्योतीचं आगमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.