
कर्जत तालुक्यात असलेल्या ग्रामीण रोटरी मंडळ यांची कबड्डी स्पर्धा देवनार रोटरी क्लब कडून दरवर्षी आयोजित करण्यात येते.माणिवली येथील हुतात्मा स्मारक येथे झालेल्या कर्जत तालुक्यातील ग्रामीण रोटरी मंडळ यांच्या कबड्डीत स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेचा शुभारंभ देवनार रोटरीचे अध्यक्ष अलका मुरली यांचे हस्ते झाला.त्यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी कन्नन,भावी अध्यक्ष नलिनी कन्नन, आणि अजित पप्पू,सुरेंद्रनाथ यांच्यासह कर्जत रोटरी ग्रामीण मंडळ समन्वयक अर्जुन तरे तसेच हुतात्मा हिराजी पाटील यांचे वारस विठ्ठल पाटील,माणिवली हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष प्रवीण डायरे, उपाध्यक्ष जितेंद्र गवळी, सचिव लहू डायरे यांच्यासह रोटरी शेतकरी ग्रामीण मंडळाचे दत्तात्रय पाटील,रोटरीचे पदाधिकारी अरुण मसणे, प्रकाश सोनवले,सीताराम बदे,मारुती बागडे गुरुजी, भरत खडेकर,देशमुख आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत ग्रामीण रोटरी मंडळाचे शेलू,हूमगाव,कळंब, पोटल पाली,माणिवली, भिवपुरी,बोरगाव, आंबेवाडी, सुतारपाडा,हे संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेत प्रमुख उपस्थित राहिलेल्या राष्ट्रीय आईस स्टॉक खेळाडू निसर्गा गवळी आणि बचत गटांची चळवळ चालवणाऱ्या रेखा हिरेमठ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या पाच महिलांचा सत्कार देखील रोटरी कडून करण्यात आला.स्पर्धेचे सुरुवातीला रोटरी अध्यक्ष अलका मुरली यांचे हस्ते हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.त्यानंतर माणिवली शाळेचे विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेसाठी आलेले खेळाडू आणि पाहुण्याचे लेझिम पथकाचे सहायाने स्वागत केले.
रोटरी कप कबड्डी स्पर्धेत कळंब येथील सुतारपाडा कबड्डी संघाने माणिवली संघाचा पराभव करून विजय मिळविला.या स्पर्धेला माणिवली ग्रामस्थ आणि माणिवली हुतात्मा स्मारक समिती यांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.त्यात विनोद गवळी, शशिकांत पाटील,दिनेश गवळी,मनोहर डायरे,दीपक पाटील,वामन गवळी,मनोहर खाडे,गुरुनाथ डायर,माजी सरपंच तुषार गवळी,पोलिस पाटील सविता गायकर,रोटरी ग्रामीण चे भरती जाधव,आदी उपस्थित होते.या स्पर्धेचे सामान्यांसाठी पंच म्हणून रामचंद्र गवळी,चंद्रकांत डायरे,सुधीर झांजे,अतुल डायरे,यांनी काम पाहिले.