Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात; नेरळ गावकऱ्यांच्या रहदारीचा प्रश्न आता सुटणार

नेरळ गावातून जाणाऱ्या कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या लहान पुल वाहतुकीस बंद होता. जून 2025 पासूनचे अखेरीस हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 13, 2026 | 02:42 PM
Karjat News :  नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात; नेरळ गावकऱ्यांच्या रहदारीचा प्रश्न आता सुटणार
Follow Us
Follow Us:
  • जागी नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात;
  • गावकऱ्यांच्या रहदारीचा प्रश्न आता सुटणार
कर्जत/संतोष पेरणे : नेरळ गावातून जाणाऱ्या कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या लहान पुल वाहतुकीस बंद होता. जून 2025 पासूनचे अखेरीस हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता.मात्र तब्बल आठ महिन्यांनी त्या जागी नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.दरम्यान,नवीन पूल बांधण्यासाठी दोन कोटींची निविदा काढली गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून गेली आठ महिने पुलाची निविदा का काढण्यात आली नाही असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गावातील खांडा येथे माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे. हा पूल किमान 40 ते 50 वर्षे जुना असून, या पुलावरून होणारी वाहतूक ही अनेक वर्षे सुरू आहे. त्यानंतर मागील 10 वर्षेआधी कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर या लहान पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला. 27 जून 2025 रोजी सायंकाळच्या वेळी या पुलाचा पाया खचला असल्याचे आणि कोणत्याहीक्षणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेतल्यावर स्थानिक लोकांनी पूल वाहतुकीस बंद केला. त्यानंतर जवळच असलेल्या नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस तेथे पोहचले आणि पुलाचा पाया याची पाहणी करून पूल वाहतुकीस तात्काळ बंद करण्यात आला. 28 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उरण येथून कर्जत नेरळ भागात आले आणि पुलाची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी पुलाची स्थिती लक्षात घेऊन पूल वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी त्या पुलावरून कोणतेही वाहन ये जा करू नये यासाठी लोखंडी पाईप लावून पूल वाहतुकीस बंद केला.त्यानंतर पावसाळा संपल्यावर पुलाचे उभारणीचे काम सुरू होईल अशी सर्वांना अपेक्षा होती.मात्र पावसाळा संपून चार महिने लोटले तरी पुलाचे बांधकाम सुरू झाले नव्हते.आता दोन महिन्यांनी पुन्हा पावसाळा येणार आहे आणि त्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Karjat News : मध्य रेल्वेच्या विकासकामाला गती ; शेलू रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या लोकलसाठी स्थानकाचे विस्तारीकरण

जून 2025 पासून मार्च महिन्याचे पहिल्या आठवड्यापर्यंत हा पूल वाहतूक बंद ठेवण्यात आला होता.या पुलाचे स्ट्रक्चल ऑडिट पावसाळ्यात झाले होते आणि त्यामुळे पुलाच्या नवीन बांधकामासाठी निविदा प्रक्रिया किमान ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणे आवश्यक होती.मात्र स्थानिक पुलाच्या आसपास होणारी वाहतूक कोंडी आणि समाज माध्यमे तसेच माध्यमांवर होणारी चर्चा यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे.माथेरान सारखे पर्यटन स्थळ कडे जाणारे प्रवासी वाहने याच रस्त्याने ये जा करीत असतात आणि असे असताना पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सर्वांना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान,या भागात वाहतूक कोंडी आणि वाहनांची कोंडी तेथे होत असून मागील नऊ महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने डोळ्यावर पट्टी बांधली होती.त्या पुलावरून वाहतूक बंद केल्यानंतर बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारे नवीन कामे अथवा कोणत्याही प्रकारची दुरुस्ती कामे हाती घेतली नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निष्काळजीपणामुळे नेरळ गावात खांडा पुलाच्या परिसरात स्थानिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.मात्र आता पुलाचे बांधकाम सुरू झाले असून पुढील दोन अडीच महिन्यात नवीन पुलाची उभारणी करण्याचे आव्हान बांधकाम खात्यावर आहे. मात्र या तीन खांब यांच्यावर उभ्या राहणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटींचा निधी लागणार आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे काय? असा प्रश्न बांधकाम क्षेत्रातील अनेक जाणकार बोलून दाखवत आहेत.

karjat Panchayat Samiti सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे, तर उप सभापती पदावर चित्रा ठाकरे

Web Title: Karjat news work on construction of new bridge begins traffic problem of neral villagers will now be solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल
1

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.