Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवले पूल : मृत्यूचा उतार संपणार कधी? कागदोपत्री प्रक्रिया सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ

अपघात पाँईट बनलेल्या नवीन कात्रज बोगदा ते नवले पूलाच्या रस्त्यावरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर सूचवलेल्या उपाययोजना फक्त शासकीय कागदावरच आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 08, 2025 | 12:09 PM
नवले पूल : मृत्यूचा उतार संपणार कधी? कागदोपत्री प्रक्रिया सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ

नवले पूल : मृत्यूचा उतार संपणार कधी? कागदोपत्री प्रक्रिया सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ

Follow Us
Close
Follow Us:
  • नवले पुलावरील मृत्यूचा उतार संपणार कधी?
  • गेल्या पाच वर्षात ११५ जणांचा बळी
  • कागदोपत्री प्रक्रिया सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ
पुणे : अपघात पाँईट बनलेल्या नवीन कात्रज बोगदा ते नवले पूलाच्या रस्त्यावरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर सूचवलेल्या उपाययोजना फक्त शासकीय कागदावरच आहेत. एका घटनेनंतर खडबडून जागे झाल्याचा आव आणल्यानंतर प्रशासन पुन्हा जैसे थे स्थितीवर येते अन् नवले पुलानरील मृत्यूचा उतार थांबत नसल्याचे वास्तव आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही कागदोपत्री प्रक्रिया सर्व सामान्यांच्या जिवाशी खेळत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या सात किलोमीटरच्या अंतरात गेल्या पाच वर्षात ११५ जणांचा बळी गेला आहे. तर, कायमस्वरूपी ९२ लोक जखमी झाले आहेत.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग म्हणजे, पुण्यातून जाणारा नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल हा साधारण ७ किलोमीटर अंतराचा आहे. या मार्गावरून पुण्यातील वाहतूकीसोबतच अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर पुर्वी वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटर होती. वारंवार होणाऱ्या अपघातानंतर हा वेग कमी करून ४० किलोमीटर एवढा करण्यात आला. पण, त्याचे पालन होत नसल्याचे वास्तव आहे. त्यासोबतच, पोलीस, पालिका, महामार्ग अशा तीन विभागांचा ताळमेळ देखील बसत नसल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे असल्याचेही मत आहे.

पोलिसांच्या पाहणीनुसार, तीव्र उतार कमी करण्यासोबतच दोन्ही बाजूला अपुर्ण असलेला सर्व्हिस रोड पुर्ण होणे गरजेचे आहे मात्र, तो जलद गतीने होताना दिसत नाही. ज्यामुळे स्थानिक वाहने मुख्य रस्त्यावर येतात. वाहने जागोजागी असलेल्या मार्गाने महामार्गावर येतात आणि त्यामुळे कोंडीसोबतच अपघाताला निमत्रंण मिळते. गेल्या महिन्यात नवले पुल परिसरात साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. अपघातानंतर एका चारचाकीला आग लागली आणि त्यात ८ जणांचा मृत्यू झाला. तर, कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिली. यापुर्वीही अनेकवेळा गंभीर अपघात या भागात झालेले आहेत. पण, एका अपघातानंतर पुर्ण प्रशासन जागे होते, आणि पुन्हा उपाययोजना सूचवल्या जातात. पण, त्या पुर्ण मात्र होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आवश्यक उपाययोजना अत्यंत लवकर करणे गरजेचे असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

नेमक होत काय?

नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल हा ७ किलोमीटर रस्ता तीव्र उताराचा आहे. त्यामुळे या भागात भरधाव अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघात होतात. अनेकवेळा चालक गाडी बंद करून डिझेल वाचविण्यासाठी तीव्र वेगाने येतात. मग, मोठ्या वाहनांचा एअर ब्रेक लागत नाही आणि अपघात होतात, असे निरीक्षण पोलिसांचे आहे. दोन वर्षापूर्वी असाच भीषण अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलिस, महामार्ग यांची एक चौकी कात्रज बोगद्याच्या आगोदर उभा करून त्याच ठिकाणी वेग तपासला जाणार होता. पण, काही दिवसानंतर पुन्हा जैसे थेच स्थिती निर्माण झाली.

काय आहेत उपाययोजना?

  • वेग मर्यादा
  • सुसंगत रबर स्पीड ब्रेकर किंवा रंबल स्ट्रिप्स
  • रस्ता ओला असताना वाहने घसरतात, त्यामुळे स्ट्रिप्स सुरक्षा मानकांनुसार बसवावे
  • वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी अॅक्शन ओरिएन्टेड प्लॅन असावा
  • पोलिस, महामार्ग प्राधिकरण आणि मनपांच्या पथकांमध्ये समन्वय वाढवण्याची गरज
  • फायर ब्रिगेडची सुविधा, रेस्क्यू टीम, अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र पथक
  • ट्रक मालक असोसिएशनची बैठक घेऊन ड्रायव्हर ट्रेनिंग, उतारावरील गतीनियंत्रण, वाहनांची नियमित तपासणी करणे

Web Title: Measures need to be taken to prevent accidents on the navle bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • Accident Case
  • CM Devedra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

मै यहा का राजा हू! मंचरमध्ये बिबट्याची पुन्हा ‘त्या’ घराजवळ एंट्री; CCTV फुटेजमध्ये झाला कैद
1

मै यहा का राजा हू! मंचरमध्ये बिबट्याची पुन्हा ‘त्या’ घराजवळ एंट्री; CCTV फुटेजमध्ये झाला कैद

चिकन, मटन, अंड्याचे दर कडाडले; पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
2

चिकन, मटन, अंड्याचे दर कडाडले; पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस

चाकण–शिक्रापूर मार्गावर धुळीचे लोट; खड्ड्यांचा रस्ता वाहतूकदारांसह नागरिकांसाठी डोकेदुखी
3

चाकण–शिक्रापूर मार्गावर धुळीचे लोट; खड्ड्यांचा रस्ता वाहतूकदारांसह नागरिकांसाठी डोकेदुखी

पुणे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मोठा निर्णय; मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती
4

पुणे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मोठा निर्णय; मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.