पिंपरी: राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोठ्या सुनेलाही अश्याच प्रकारे त्रास दिल्याचे समोर येत आहे. त्यावेळी मोठ्या सुनेने महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. आणि तसे झाले असेल तर आज ही घटना घडली नसती असे मत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
तटकरे यांनी वैष्णवीच्या आईवडील आणि नातेवाईकांचे भेट घेऊन सांत्वन केले. पुढे त्या म्हणाल्या की, बाळाला ताब्यात घेण्यासाठी कसपटे कुटुंबिय धडपड करत होते. नीच आरोपींवर कारवाई होणारच असे आदिती तटकरे यांनी म्हटले. या प्रकरणी हलगर्जीपणा झाला असेल तर कारवाई केली जाईल.
पुढे बोलताना आदिती तटकरे यांनी म्हटले की, मोठ्या सूनेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले, असेल तर बघावे लागेल. आज वैष्णवीचे बाळ कसपटे कुटुंबियांकडे सुरक्षित आहे. गमावलेल्या बहिणीला न्याय मिळून देणे ही आमची जबाबदारी आहे. मयुरीच्या तक्रारीकडे ज्यांनी दुर्लक्ष केले, त्यांच्यावर कारवाई होणार. कुटुंब म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळून देणं हे अधिक गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या केसमध्ये अपडेट घेऊन आहेत, असेही आदिती तटकरे यांनी म्हटले.
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलीये. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सविस्तर चाैकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. यासोबतच वैष्णवीचे बाळ सुखरूप तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. वैष्णवी हगवणे प्रकरणात काही स्क्रीनशॉर्ट आणि ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होताना दिसत आहेत. त्याची देखील चाैकशी केली जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
CM फडणवीसांच्या ‘या’ वक्तव्याने आरोपींचे धाबे दणाणले
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आली आहे. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई केलेली आहे. या घटनेचा संपरून तपास पोलिस करतील.”
Vaishnavi Hagwane Case: वैष्णवी मृत्यू प्रकरण; CM फडणवीसांच्या ‘या’ वक्तव्याने आरोपींचे धाबे दणाणले
“त्रास देऊन जीव द्यायला लावणे हे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाही. या प्रकरणात जी कारवाई करता येईल ती आम्ही करू. मकोका कायदा लावण्यासाठी काही नियम असतात. नियमात असेल तर माकोका लावला जेल. पण ते आज सांगता येत नाही. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.