Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना…”; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सभागृहात निवेदन

राज्यस्तरावर महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा क्षेत्रस्तरावर स्थानिक विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 13, 2025 | 02:35 AM
“मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना…”; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सभागृहात निवेदन
Follow Us
Close
Follow Us:

बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यास मंजुरी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सभागृहात निवेदन
नकाशांवर दर्शविलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यात येणार

नागपूर: ग्रामीण भागातील शेत आणि पाणंद रस्त्यांची वाढती गरज लक्षात घेता, तसेच मनरेगा अंतर्गत कामांमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना (Farmers) भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदन केले.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, शेतीमधील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेऊन ही योजना महसूल विभागामार्फत पूर्णतः यंत्रसामग्रीच्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना विभागाची ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ पूर्ववत सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महानगरपालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? बावनकुळेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

बारमाही, मजबूत रस्त्यांचे बांधकाम करून पेरणी, मशागत, कापणी आणि शेतमाल वाहतुकीस गती देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. यानुसार गाव नकाशांवर दर्शविलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यात येणार आहे. रस्ते बांधणीस लागणाऱ्या गाळ, माती, मुरुम व दगडासाठी कोणतेही रॉयल्टी शुल्क आकारले जाणार नाही. रस्त्यासाठी आवश्यक तातडीची मोजणी शुल्क व पोलीस बंदोबस्त शुल्क पूर्णपणे माफ असणार आहे. योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडून अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करुन देण्यात येईल.

मोठी बातमी ! जमीन तुकडीकरण कायद्यात सुधारणा केली जाणार; महसूलमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण संकेत

सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधूनही निधी घेण्याची सुविधा; याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावे स्वतंत्र खाते उघडण्यात येणार आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी बहुस्तरीय समित्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा क्षेत्रस्तरावर स्थानिक विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतात ये-जा सुलभ होणार असून बाजारपेठेशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीव्यवस्थेला मोठा आधार मिळेल, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Web Title: Minister bawankule cabinet approval for implementation cm baliraja shet panand road scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule
  • Farmers
  • Nagpur News

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! अवकाळीच्या नुकसानीची भरपाई ‘या’ महिन्यात मिळणार , मदत व पुनर्वसन मंत्र्यांची माहिती
1

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! अवकाळीच्या नुकसानीची भरपाई ‘या’ महिन्यात मिळणार , मदत व पुनर्वसन मंत्र्यांची माहिती

Leopard : पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; शेतकऱ्यांची वन विभागाकडे मोठी मागणी
2

Leopard : पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; शेतकऱ्यांची वन विभागाकडे मोठी मागणी

उसाला फुटले तुरे, शेतकरी चिंतेत; कारखान्यांनी वेळेत ऊसतोड करण्याची मागणी
3

उसाला फुटले तुरे, शेतकरी चिंतेत; कारखान्यांनी वेळेत ऊसतोड करण्याची मागणी

नागपुरात ‘कूल-कूल’; 8 अंशांपर्यंत घसरला तापमानाचा पारा, घराबाहेर पडणे झालं कठीण
4

नागपुरात ‘कूल-कूल’; 8 अंशांपर्यंत घसरला तापमानाचा पारा, घराबाहेर पडणे झालं कठीण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.