नाशिक : कांद्यावरून राजकारण चांगलेच तापले असताना, आता मंत्री दादा भुसे यांच्या अजब सल्ला दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या सल्ल्याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कांद्यावरून मागील काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
कांदा उत्पादक शेतकरी भलताच अडचणीत सापडला आहे. शनिवारपासून केंद्र सरकारने (Central government) कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचे आता पडसाद राज्यभर उमटताना दिसताहेत. आगामी काळात टोमॅटोसारखी कांद्याची (onion) स्थिती होणार असल्याचं बोललं जातयं. दरम्यान, टोमॅटोचे भाव कमी झाल्यानंतर आता कांद्याने वांद्या केला आहे.
कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने राज्यभर पडसाद
केंद्र सरकारने देशातून होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे, याच्या निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात शुल्क वाढीनंतर नाराज व्यापारी आणि उत्पादक अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा पुन्हा एकदा कांदा रडवणार असून, आजपासून नाशिकमध्ये कांदा लिलाव १५ दिवस बंद करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये कांदा लिलाव १५ दिवस बंद…
कांद्याचे कंटेनर थांबले…
शनिवारी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला खरा. पण या निर्णयाआधीच अनेक व्यापाऱ्यांचा माल निर्यातीसाठी रवाना झाला होता. तसेच रविवारी सुट्टीचा दिवस आल्याने मुंबई जेएनपीटी पोर्ट बाहेर तसेच नाशिकला जानोरीच्या कस्टम ऑफिस बाहेर शेकडो कंटेनर उभे असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून दिली जातेय. आता या कंटेनरमधील कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागणार का ? पुढे काय दर या कांद्याला मिळणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत स्पष्टता किंवा माहिती निर्यातदार किंवा व्यापाऱ्यांना दिली जात नसल्याने संभ्रम वाढलंय. तसेच एका कंटेनरमध्ये 30 टन म्हणजे 30 हजार किलो कांदा माल असतो. यावरून किती कांदा निर्यातीसाठी थांबल्याच अंदाज येतो. यामुळं शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.