Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री जयकुमार गोरे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांचं गाऱ्हाण ऐकून झाले भावूक

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवार केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2025 | 02:38 PM
मंत्री जयकुमार गोरे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांचं गाऱ्हाण ऐकून झाले भावूक

मंत्री जयकुमार गोरे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांचं गाऱ्हाण ऐकून झाले भावूक

Follow Us
Close
Follow Us:

वडूज : संपूर्ण महाराष्ट्र तसेच सातारा जिल्ह्यासह माण, खटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या आठ ते दहा दिवसांत झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुरामुळे शेती, पिके, घरांची अनेक ठिकाणी झालेली पडझड ,पशुधन तसेच रस्त्यांचे नुकसान आदींची पाहणी ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवार केली.

यामध्ये कुळकजाई, मलवडी, भांडवली, आंधळी, टाकेवाडी, म्हसवड, पळशीसह माण मतदार संघातील इतर ठिकाणी अतिवृष्टी व नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री जयकुमार गोरेंनी करून पिकांचे नुकसान झालेले शेतकरी व अतिवृष्टीमुळे घरांच्या पडझडी झालेल्या नुकसान ग्रस्त नागरिकांच्या भेटी घेतल्या. या अतिवृष्टीमुळे गावोगावी शेतीपिकांचे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी दळणवळणासाठी महत्वाचे असलेले पूल वाहून गेले आहेत. त्या पुलांची व रस्त्यांच्या दुरुस्तीच्या सूचना मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पळशी तालुका माण येथील नवनाथ पाटोळे यांचा माणगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून पुराच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या निवासस्थानी भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून शासनाकडून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले.

म्हसवड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून खचलेल्या रस्त्याचं झालेले नुकसान आणि विविध भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना करून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही गोरे यांनी यावेळी दिले.

नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या व नागरिकांच्या भेटीदरम्यान त्यांना झालेल्या नुकसानीची शासनाकडून अधिकाधिकमदत मिळवून देतानाच सोबत असलेले वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार प्रतिनिधी, तलाठी, मंडळ अधिकारी व अन्य प्रशासकीय यंत्रणेला शेतकरी बांधवांच्या नुकसानीची योग्य व सरसकट नोंद घेण्याच्या सूचना केल्या.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे, प्रांत उज्वला गाडेकर, तहसिलदार विकास अहिर, मुख्याधिकारी सचिन माने, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, बांधकामसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, पाहणी दौऱ्यातील विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

परिस्थिती भयंकर असली तरी शेतकरी व नागरिकांनी खचून न जाता धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन करत अतिवृष्टीसारख्या अस्मानी संकटामुळे झालेल्या शेती, पिक व अन्य नुकसानीची मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक मदत मिळावी, यासाठी तत्काळ पाठपुरावा केला असून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत.

Web Title: Minister jayakumar gore has inspected the damaged areas in satara district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Farmers
  • Jaykumar Gore

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी सत्तेत भाजपसोबत, काँग्रेस एकाकी; सांगलीत नेमकं काय घडलं?
1

राष्ट्रवादी सत्तेत भाजपसोबत, काँग्रेस एकाकी; सांगलीत नेमकं काय घडलं?

घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर
2

घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…
3

ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…

उदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर, तर उपमहापौर…; चंद्रकांत पाटील यांची घोषणा
4

उदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर, तर उपमहापौर…; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.