Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! कृषीप्रधान महाराष्ट्रात दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांचा जातोय जीव, मंत्री म्हणाले, हे अंशत: खरे!

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील केलं जातं आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 12, 2025 | 12:15 PM
कृषीप्रधान महाराष्ट्रात दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांचा जातोय जीव (फोटो सौजन्य-X)

कृषीप्रधान महाराष्ट्रात दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांचा जातोय जीव (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न फार गंभीर आहे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण केलं जातं. तसेच विरोधी पक्ष सातत्यानं सरकारवर शेतकऱ्यांसाठी काय केलं, अशा स्वरुपाच्या प्रश्नांची सरबत्ती करत असतो. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, गेल्या ५६ महिन्यांत म्हणजेच राज्यात दररोज सरासरी आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे अंशतः खरे आहे. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती भागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण इतर प्रदेशांपेक्षा जास्त असल्याची देखील माहिती दिली आहे.

कोणत्या प्रदेशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या?

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरणारे घटक आणि पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला. मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मराठवाडा विभागात ९५२, अकोल्यात १६८, वर्ध्यात ११२, बीडमध्ये २०५ आणि अमरावती विभागात १,०६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी संसदेत माहिती दिली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर भागात ९५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान, छत्रपती संभाजीनगर भागात ९५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी ७०७ जण मदत मिळण्यास पात्र होते आणि ४३३ प्रकरणांमध्ये मदत मिळाली. बीड जिल्ह्यात १६७ प्रकरणांमध्ये मदत मंजूर करण्यात आली आणि १०८ प्रकरणांमध्ये आर्थिक मदत देण्यात आली.

जालनाचे आकडे काय आहेत?

अमरावती विभागात ४४१ प्रकरणांमध्ये शेतकरी मदतीसाठी पात्र होते आणि ३३२ प्रकरणांमध्ये मदत मिळाली. एका विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री म्हणाले की, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

Web Title: Minister makarand jadhav patil says eight maharashtra farmers ended lives daily partially true

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • agriculture
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार
1

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ 11 सदस्यांची समिती केली गठीत
2

पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ 11 सदस्यांची समिती केली गठीत

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले
3

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना
4

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.