Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कॉफी टेबल पुस्तकात आगरी-कोळी भूमिपुत्रांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाची उपेक्षा झाल्याचा आरोप करत आगरी-कोळी समाज आक्रमक झाला आहे. वादग्रस्त पुस्तक तात्काळ रद्द करून त्याचे पुनर्लेखन करावे, तसेच पुस्तक निर्मिती समितीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी.....

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2026 | 02:21 PM
आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी

आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी

Follow Us
Follow Us:
  • केडीएमसीच्या कॉफी टेबल पुस्तकावरून वाद
  • आगरी-कोळी समाजाची पुनर्लेखन आणि चौकशीची मागणी
  • भूमिपुत्रांचे योगदान डावलल्याचा आरोप
  • महापौरांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कॉफी टेबल पुस्तकातून आगरी-कोळी भूमिपुत्रांचे योगदान डावलल्याने आगरी कोळी समाज आक्रमक झाला असून याचे तीव्र पडसाद सर्वच स्तरांतून उमटत आहेत. हे वादग्रस्त पुस्तक रद्द करून त्याचे पुनर्लेखन करण्यात यावे. तसेच हा अपमान करणाऱ्या पुस्तक निर्मिती समितीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आगरी ग्रंथालय चळवळ संस्थेने केली असून याबाबत संस्थेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या पुस्तकाबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी साहित्यिक सर्वेश तरे, दया नाईक, गायक केतन पाटील, गजानन पाटील, डॉ.शोभा पाटील, उमेश संते, कर्सन पाटील, स्वप्निल म्हात्रे, जतिन पाटील, सॅन्डी पाटील आदीजण उपस्थित होते.

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपला; मनसेचा मोठा पाठिंबा

कल्याण-डोंबिवली शहराच्या जडणघडणीत, विकासात आणि या शहराला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यात येथील मूळ भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाने आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी देऊन मोलाचे योगदान दिले आहे. परंतु, अत्यंत खेदाची आणि संतापाची बाब म्हणजे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहराच्या माहितीबाबत प्रकाशित केलेल्या पुस्तकातून या स्थानिक आगरी-कोळी समाजाचा इतिहास, संस्कृती, लोकपरंपरा आणि शहराच्या विकासातील त्यांचे योगदान जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. इथल्या मूळ भूमिपुत्रांचा हा घोर अपमान असून, यामुळे संपूर्ण आगरी-कोळी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांचा इतिहास पुसून टाकणारे आणि त्यांचा अपमान करणारे हे वादग्रस्त पुस्तक त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्याचे पुढील वितरण तत्काळ थांबवण्यात यावे.

या भागातील स्थानिक संस्कृतीला डावलून जाणीवपूर्वक हा अपमान करणाऱ्या संबंधित ‘पुस्तक निर्मिती समितीची’ सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आली.आगरी ग्रंथालय चळवळ’ ही संस्था गेली १६ वर्षे आगरी बोलीभाषा आणि आगरी-कोळी संस्कृतीच्या जतन व संवर्धनाचे अविरत आणि अभ्यासपूर्ण काम करत आहे. या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे केडीएमसीने इथल्या मूळ भूमिपुत्रांच्या सन्मानार्थ आगरी-कोळी संस्कृतीचा गौरवशाली इतिहास मांडणारे एक ‘विशेष पुस्तक’ नव्याने प्रकाशित करावे. जर या नवीन पुस्तकाच्या संकलनाचे व निर्मितीचे कार्य ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ या संस्थकडे सोपवले, तर अत्यंत जबाबदारीने, पुराव्यांसह आणि अभ्यासपूर्ण रीतीने हा इतिहास शब्दबद्ध करू. यामुळे इथल्या संस्कृतीचे योग्य दस्तावेजीकरण होईल आणि भूमिपुत्रांना खरा न्याय मिळेल अशी मागणी केली असल्याची माहिती साहित्यिक सर्वेश तरे यांनी दिली.

Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”

Web Title: Kdmc coffee table book agari koli community protest demand rewrite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC
  • maharashtra

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
1

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.