Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पुन्हा मोठ्या फेरबदलांची चर्चा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीची शक्यता

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुन्हा एकदा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीस दलातील हालचालींना वेग आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 18, 2026 | 03:51 PM
आता पुणे पोलिस करणार भाडेकरूंची पडताळणी; माहिती न दिल्यास थेट होणार कारवाई

आता पुणे पोलिस करणार भाडेकरूंची पडताळणी; माहिती न दिल्यास थेट होणार कारवाई

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पुन्हा मोठ्या फेरबदलांची चर्चा
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीची शक्यता
  • कोणत्या पोलीस ठाण्याची किंवा विभागाची जबाबदारी मिळणार
सावन वैश्य, नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुन्हा एकदा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फेरबदल होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पुढील आठवडाभरात अनेक महत्त्वाच्या पदांवर बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीस दलातील विविध स्तरांवर हालचालींना वेग आला आहे.

काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस उपायुक्त (DCP) यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्यांमध्येही बदल करण्यात आले. आता पुन्हा एकदा काही पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू झाली असून, पदोन्नती मिळालेल्या काही अधिकाऱ्यांनाही नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे.

APMC Police Action : एपीएमसी पोलिसांची धडक कारवाई; वेश्याव्यवसायाविरोधात मोहीम, अतिक्रमणावरही संयुक्त कारवाई

या संभाव्य फेरबदलांमुळे कोणत्या अधिकाऱ्याला कोणत्या पोलीस ठाण्याची किंवा विभागाची जबाबदारी मिळणार, याकडे पोलीस दलासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे. नव्याने नियुक्त होणारे अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात कायद्याची अंमलबजावणी, गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकाभिमुख पोलीसिंग कशा पद्धतीने राबवतील, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी त्यांच्या कार्यकाळात गुणवत्ता, कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणाला प्राधान्य देत अनेक सक्षम अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, काही पोलीस ठाण्यांना ‘क्रीम पोस्ट’ म्हणून ओळखले जात असतानाही नियुक्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव न स्वीकारता योग्य अधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई हे राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. आयटी क्षेत्र, आशियातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) अंतर्गत फळ व भाजीपाला बाजार, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, शैक्षणिक संस्था, औद्योगिक क्षेत्रे आणि मोठ्या प्रमाणावरील नागरी विस्तार यामुळे शहराचे धोरणात्मक महत्त्व वाढले आहे. त्यामुळे या सर्व संवेदनशील आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सक्षम व अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

आगामी फेरबदलांमधून कोणत्या अधिकाऱ्याला कोणती जबाबदारी दिली जाते आणि त्याचा शहरातील कायदा-सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षेवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील संभाव्य बदल्यांची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या नव्या कार्यपद्धतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी

Web Title: Navi mumbai police commissionerate senior officers transfer reshuffle likely next week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • maharashtra
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय
2

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.