Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही…”; महापालिका निवडणुकांबाबत रामदास आठवलेंचे महत्वाचे भाष्य

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत येण्यासाठी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्या बाबत आग्रह करेन, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2025 | 06:59 PM
“ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही…”; महापालिका निवडणुकांबाबत रामदास आठवलेंचे महत्वाचे भाष्य
Follow Us
Close
Follow Us:

जत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष असून त्यांच्या नेतृत्वात देशाची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. आर्थिक दृष्ट्या भारत एक सक्षम देश बनत आहे. त्यामुळे देशाच्या विकासाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी एनडीए मध्ये यावं. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत येण्यासाठी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्या बाबत आग्रह करेन, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

सांगली जिल्ह्यातील जत येथे रिपाइ आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव संजय कांबळे यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या अभ्यासिका सभागृहाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी रामदास आठवले हे बोलत होते.  यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शरद पवार आले असते तर कदाचित ते राष्ट्रपती सुद्धा बनू शकले असते, असं सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले, कॉमन मिनिमम प्रोग्राम हाती घेऊन मोदी आणि पवार हे दोन नेते एकत्र येणे गरजेचे आहे.

 उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही, कारण मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे, अस सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे आमच्यासोबत आले होते, मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही. उलट विधानसभेला ते आमच्या सोबत नव्हते त्यावेळी आम्हाला जास्त प्रमाणात यश मिळालं. त्यामुळे रोज भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांचा महायुतीला कसलाही प्रकारचा उपयोग नाही. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाआघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल असं मत ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केल.

NDA मध्ये आमच्यावर अन्याय होतोय- रामदास आठवले 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बद्दल भ्रमनिरास होऊ लागला आहे. युतीमध्ये ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आठवले’ या त्यांच्या पक्षाच्या दुर्लक्षामुळे आठवले दुखावले आहेत आणि संतापले आहेत. रविवारी त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आणि महाआघाडीत आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले.

Ramdas Athawale News: NDAमध्ये आमच्यावर अन्याय होतोय..; रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत

माध्यमांशी झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय होत आहे, परंतु शरद पवार आणि काँग्रेससोबतच्या युतीच्या काळात आमच्या पक्षाला सत्तेत सन्मानजनक सहभाग मिळत असे. तर आज आपली समस्या अशी आहे की मला मंत्रीपद मिळाले आहे. पण माझ्या पक्षात एकही खासदार किंवा आमदार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या पक्षाची ताकद जाणतात. म्हणूनच त्यांनी मला तीनदा मंत्रिमंडळात समाविष्ट केले. पण माझ्या पक्षातील इतरांना काहीही मिळत नाही.  पक्षातील इतर लोकांना दिल्लीत काहीही मिळाले नाही आणि महाराष्ट्रातही त्यांना कोणतेही पद मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Minister ramdas athwale statement on raj and uddhav thackeray alliance local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • Local Body Elections
  • Maharashtra Politics
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
1

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप
2

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
3

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
4

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.