Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॅनरबाजी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचा पदाधिकारी पोलीस ठाण्यात, नेमकं प्रकरण काय

डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या 20 सप्टेंबरला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आधी डोंबिवली पश्चिमेत ठीक ठिकाणी खड्डे डे अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पुढचा तपास विष्णूगर पोलिसांनी सुरू केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2024 | 12:49 PM
बॅनरबाजी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचा पदाधिकारी पोलीस ठाण्यात

बॅनरबाजी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचा पदाधिकारी पोलीस ठाण्यात

Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात करण्यात आलेली बॅनरबाजी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला चांगलेच भोवलं आहे. यानंतर डोंबिवली राजकारण चांगलंच तापल्याच पाहायला मिळत आहे. पोलीस ठाण्यात दीपेश मात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दीपेश मात्रे यांना नोटीस बाजवली होती. याबाबत विचारपूस करण्यासाठी दीपेश म्हात्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. मात्र यावेळी त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर एकच गर्दी केली होती.

हेदेखील वाचा- मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी संतोष नलावडे यांची नियुक्ती, राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केलं जाहीर

डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या 20 सप्टेंबरला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आधी डोंबिवली पश्चिमेत ठीक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवर खड्डे डे असे लिहिले होते. या बॅनरबाजी नंतर डोबिंवलीतील राजकारण चांगलचं तापलं होतं. या प्रकरणात गोंधळ निर्माण झाल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी याप्रकरणी बॅनर लावणाऱ्या आणि छापणाऱ्या जॉली प्रिंटर विरोधात गुन्हा दाखल केला. यांनतर पोलिसांनी जॉली प्रिंटर्सच्या संचालकाचा जबाब नोंदवला.

जॉली प्रिंटसच्या संचालकाने सांगितले की, त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्या सांगण्यावरून हे सर्व बॅनर लावले होते. जॉली प्रिंटसचे संचालकांनी दिलेल्या जबाबावर पोलिसांनी दीपेश म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. याप्रकरणी सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. भाजपचे पदाधिकारी संदीप माली आणि शहर प्रमुख नंदू परब यांच्यासमोर जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य सील करण्यात आले. या प्रकरणाच्या पुढचा तपास विष्णूगर पोलिसांनी सुरू केला आहे.

हेदेखील वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे करणार उद्घाटन

दीपेश म्हात्रे यांना विष्णू नगर पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती. बुधवारी सकाळी शिंदे गटाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे विष्णू नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. विष्णू नगर पोलिसांनी त्यांच्यावर काय गुन्हा दाखल केला आहे, हे जाणून घेण्यासाठी दीपेश म्हात्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून दीपेश म्हात्रे तिथून निघून गेले. मात्र या दरम्यान पोलीस स्टेशनच्या बाहेर यांच्या समर्थकांची एकच गर्दी केली होती.

याबाबत दीपेश म्हात्रे यांचे म्हणणे आहे की, शहरात काही ठिकाणी खड्ड्यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच याबाबत पोलिसांनी मला नोटीस वाजवली होती. पोलिसांना मी त्या नोटीसचे उत्तर देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. पोलिसांना जे काय उत्तर द्यायचे होते मी दिले आहे यामध्ये पोलिसांवर रोष नाही, मात्र ज्या प्रकारे या विधानसभेत दडपशाही सुरू आहे या दडपशाहीला आम्ही भिक घालत नाही, असे दीपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितलं.

 

Web Title: Minister ravindra chavans birthday banner a case has been filed against dipesh mhatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 12:46 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Ravindra Chavan
  • Shinde group

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
2

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
3

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा
4

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.