पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपीने निबंध लिहिला
पुणे : पुणे पोर्श अपघात प्रकरणामध्ये अपडेट समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील या प्रकरणामुळे यंत्रणा जागी झाली आहे. बिल्डर वडिलांच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या या अपघातामुळे दोन जणांचा जीव गेला. आरोपीला पहिल्यांदा अटक केल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अवघ्या 15 तासांमध्ये निबंध लिहिण्याच्या शिक्षेवर जामीन देण्यात आला होता. यामुळे देशभरामधून सर्वांनी रोष व्यक्त केला होता. यानंतर दोन महिन्यांतर पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन लाडोबा आरोपीने अखेर निबंध लिहिला आहे.
पोर्शे अपघात प्रकरणातील बिल्डरचा अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याला जामीन मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याची बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर अखेर अल्पवयीन मुलाने 300 शब्दांचा निबंध लिहिला आहे. या निंबधामध्ये अपघात घडल्यनंतर काय करायले हवे किंवा अपघात घडू नये म्हणून स्वत: काय काळजी घ्यावी या पद्धतीचा निबंध लिहणे आवश्यक होते. बालनिरीक्षणगृहातून बाहेर पडल्यानंतर अखेर अल्पवयीने मुलाने 300 शब्दांचा निंबध बालहक्क मंडळकडे वकिलांच्यामार्फत सादर केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाचे आई- वडिल अजूनही इतर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहेत. त्यांची चौकशी अद्याप सुरू आहे. हे प्रकरण निबंध लिहिण्याच्या शिक्षेमुळे जास्त चर्चेत आले. अल्पवयीन मुलाने मद्यपान करत भरधाव वेगाने गाडी चालवली. यामध्ये त्याने भीषण अपघात करत दोन लोकांची जीव घेतला. मात्र बड्या बिल्डरचा मुलगा असल्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. यावेळी निबंध लिहिणे आणि वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याची शिक्षा त्याला देण्यात आली होती. या शिक्षेचा सर्व स्तरातून निषेध झाल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला पुन्हा एकदा अटक केली.