Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या महत्त्वाच्या सार्वजनिक वास्तूंच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लता मंगेशकर नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणेचा प्रश्न अद्याप कायम असून, कार्यक्रमांच्या वेळी कलाकारांसह प्रेक्षकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 02, 2026 | 11:43 AM
कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

Follow Us
Follow Us:
  • लता मंगेशकर नाट्यगृहात AC बंद
  • आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या छताला गळती
  • MBMCच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
विजय काते, मीरा-भाईंदर : शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन भव्य वास्तू उभारल्या. यामध्ये स्वर्गीय लता मंगेशकर नाट्यगृह आणि आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहाचा समावेश आहे. मात्र, लोकार्पणाला वर्ष उलटत नाही तोच या दोन्ही वास्तूंमध्ये विविध समस्या डोके वर काढू लागल्याने महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Mira Bhayandar News)

एकीकडे शहरातील कलाकार, नाट्यरसिक आणि नागरिकांसाठी दर्जेदार सुविधा देण्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे नाट्यगृहाच्या वातानुकूलन व्यवस्थेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. नाटकाच्या प्रयोगादरम्यान एसी व्यवस्था कोलमडल्याने कलाकारांना आणि प्रेक्षकांना उकाड्याचा सामना करावा लागतो. परिस्थिती इतकी गंभीर होते की, प्रयोगासाठी आलेल्या कलाकारांनाच प्रेक्षकांची माफी मागण्याची वेळ येते.

मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

यापूर्वी ‘आमने-सामने’, तसेच अभिनेत्री प्रिया बापट, उमेश कामत आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांसारख्या कलाकारांच्या कार्यक्रमांदरम्यानही वातानुकूलन व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे प्रश्न केवळ एसी बिघडण्याचा नसून, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीचा आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहही गळतीच्या विळख्यात!

दुसरीकडे आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहाची अवस्थाही काही वेगळी नसल्याचे चित्र समोर आले आहे. आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त, महापौर, पोलीस आयुक्त, विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी तसेच विविध मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

मात्र, याच महत्त्वाच्या बैठकीदरम्यान सभागृहाच्या छताला गळती लागल्याने प्रशासनाची अक्षरशः फजिती झाली. मोठमोठे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित असताना सभागृहाच्या छताला गळती लागणे ही बाब महापालिकेच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.

करोडोंचा खर्च, पण सुविधा कुठे?

नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या वास्तूंची अशी अवस्था होत असेल, तर या वास्तूंची देखभाल नेमकी कोण करणार आणि त्यासाठी महापालिकेची यंत्रणा काय करत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे या सभागृहांचे भाडेही सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाणारे असून कार्यक्रमांसाठी हजारो ते लाखो रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. मग एवढे भाडे आकारूनही नागरिकांना आणि कलाकारांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर या वास्तूंचा उपयोग तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘वास्तू उभारणे सोपे, पण सांभाळणे कठीण?’

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य वास्तू उभारल्या, त्यांचे लोकार्पण केले आणि त्यानंतर देखभालीकडे दुर्लक्ष केले, तर काही वर्षांत या वास्तूंची अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे. आज एसी बंद, उद्या छताला गळती आणि पुढे आणखी कोणती समस्या निर्माण होणार? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. महापालिकेने केवळ उद्घाटनाच्या फिती कापण्यापुरते मर्यादित न राहता या वास्तूंची नियमित देखभाल, तांत्रिक तपासणी आणि तत्काळ दुरुस्तीची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.

अन्यथा, जनतेच्या पैशातून उभारलेल्या या कोट्यवधींच्या वास्तू काही वर्षांतच भव्य इमारती नव्हे, तर महापालिकेच्या निष्काळजी कारभाराची स्मारके ठरतील, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

Web Title: Mira bhayandar news municipal corporation neglect lata mangeshkar theatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Lata Mangeshkar
  • maharashtra
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
1

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
2

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा
3

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
4

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.