Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mitti Cafe : दिव्यांगांच्या कौशल्याला नवे व्यासपीठ! राज्यपालांच्या हस्ते मिट्टी कॅफेचे उद्घाटन,

Mitti Cafe : दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्याला आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ देणाऱ्या ‘मिट्टी कॅफे’चे मुंबईत उद्घाटन झाले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी या उपक्रमाचे कौतुक करत व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.

  • By विवेक
Updated On: Oct 17, 2026 | 08:11 PM
Mitti Cafe inauguration

Mitti Cafe inauguration

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील ओबेरॉय स्कायसिटी मॉलमध्ये मिट्टी कॅफेचे उद्घाटन
  • दिव्यांग व्यक्तींना रोजगार आणि स्वावलंबनाची संधी
  • शब्दांपेक्षा कृतीतून सेवाभाव व्यक्त होतो
 

मुंबई : दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि सन्मान मिळाल्यास त्या स्वावलंबी होऊन समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज अधोरेखित करत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ‘मिट्टी कॅफे’ (Mitti Cafe) या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. मुंबईतील ओबेरॉय स्कायसिटी मॉल येथे त्यांच्या हस्ते मिट्टी कॅफेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार अतुल भातखळकर, उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी आमदार सुभाष पासी, ज्येष्ठ पत्रकार कुमार राकेश, मिट्टी कॅफेच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलिना आलम आणि ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कॅफेमध्ये काम करणाऱ्या दिव्यांग सदस्यांचे पालकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दिव्यांगांच्या कौशल्याला रोजगाराचे व्यासपीठ

मिट्टी कॅफे ही केवळ कॅफेची साखळी नसून दिव्यांग व्यक्तींना आर्थिक स्वावलंबन आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणारा सामाजिक उपक्रम आहे. अलिना आलम यांनी 2017 मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक दिव्यांगत्व असलेल्या प्रौढ व्यक्तींना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी देणे आणि त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या भाषणात व्यक्तीचे काम, प्रयत्न आणि समर्पण यातून तिच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडत असल्याचे सांगितले. प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. अनेकदा कृती आणि कामातील प्रामाणिकपणाच विचार व्यक्त करतात. मिट्टी कॅफेमध्ये कार्यरत दिव्यांग व्यक्ती आपल्या कामातून हे सिद्ध करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्यवसायासोबत सामाजिक जबाबदारीही महत्त्वाची

व्यावसायिक उपक्रम राबवताना केवळ आर्थिक लाभाचा विचार न करता समाजातील विविध घटकांच्या क्षमता आणि गरजांचाही विचार केला पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी केले. दिव्यांग व्यक्तींच्या काम करण्याच्या पद्धतीपेक्षा त्यांच्या क्षमता, निष्ठा आणि समर्पणाला महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यांना रोजगाराच्या संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेतल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मिट्टी कॅफेसारखे उपक्रम दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास मदत करतात. दिव्यांग व्यक्तींना केवळ मदतीची गरज असलेला घटक न मानता समाजाच्या प्रगतीतील सक्रिय भागीदार म्हणून पाहिले पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून दिला जातो.

एका छोट्या सुरुवातीपासून देशभर विस्तार

मिट्टी कॅफेच्या संस्थापक अलिना आलम यांनी उपक्रमाच्या प्रवासाची माहिती दिली. एका छोट्या टेबल आणि छत्रीपासून सुरू झालेला हा उपक्रम आज देशभरातील सुमारे 80 ठिकाणी पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती भवन, मुंबई, बंगळुरू आणि लखनऊ विमानतळे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह विविध ठिकाणी मिट्टी कॅफे कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. इन्फोसिस, विप्रो आणि मर्सिडीज-बेंझ यांसारख्या कंपन्यांच्या परिसरातही या कॅफेचे संचालन केले जाते.

या उपक्रमातून आतापर्यंत दोन कोटींहून अधिक कॉफीचे कप ग्राहकांना देण्यात आले असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 80 लाखांहून अधिक जेवणाची ताटे वितरित करण्यात आल्याचे अलिना आलम यांनी सांगितले. योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास दिव्यांग व्यक्ती स्वतः स्वावलंबी होण्यासोबतच समाजातील गरजू घटकांनाही मदत करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

दिव्यांग सदस्यांच्या सहभागातून उद्घाटन

कार्यक्रमात मिट्टी कॅफेमधील दिव्यांग सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. दोन सदस्यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. बौद्धिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींनी तयार केलेला केक राज्यपालांनी कापला. त्यानंतर त्यांनी कॅफेमध्ये पहिली ऑर्डर दिली. व्हीलचेअरवरील कॅशियर आणि दिव्यांग प्रौढ सदस्यांच्या चमूने ही ऑर्डर सर्व्ह केली.

दिव्यांग व्यक्तींचे कौशल्य, आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबन यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच समाजात समावेशकतेची भावना रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय

💡

Frequently Asked Questions

  • Que: मिट्टी कॅफे म्हणजे काय?

    Ans: मिट्टी कॅफे हा दिव्यांग व्यक्तींना रोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेला सामाजिक उपक्रम आहे. या कॅफेमध्ये दिव्यांग प्रौढ व्यक्ती काम करतात.

  • Que: मिट्टी कॅफेची सुरुवात कधी आणि कोणी केली?

    Ans: अलिना आलम यांनी 2017 मध्ये मिट्टी कॅफेची सुरुवात केली. एका छोट्या टेबल आणि छत्रीपासून सुरू झालेला हा उपक्रम देशभरातील सुमारे 80 ठिकाणी पोहोचला आहे.

  • Que: मुंबईतील मिट्टी कॅफेचे उद्घाटन कोणी केले?

    Ans: मुंबईतील ओबेरॉय स्कायसिटी मॉल येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मिट्टी कॅफेचे उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Mitti cafe mumbai inauguration governor jishnu dev varma vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Maharashtra Govenment
  • Maharashtra Governor

संबंधित बातम्या

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
1

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

फक्त बँक खाते उघडून चालणार नाही! स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही मिळायला हवे; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
2

फक्त बँक खाते उघडून चालणार नाही! स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही मिळायला हवे; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.