
आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष
आमदार तापकीर यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
पाणीपुरवठा योजना
५०० कोटी निधीची तातडीची आवश्यकता असून ३२ गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी किमान ५०० कोटी निधी त्वरित मंजूर करण्यात यावा.
ड्रेनेज व मलनिस्सारण
४०० कोटींची स्वतंत्र तरतूद करत आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी ड्रेनेज व मलनिस्सारण योजनांना प्राधान्य देणे अत्यावश्यक.
२४×७ पाणीपुरवठा योजना
निधीअभावी झालेली मंदगती दूर करणे. हा प्रकल्प पुणे व परगावांसाठी जीवनावश्यक असल्याने शासनाने आवश्यक निधी त्वरित देणे गरजेचे.
कर आकारणी परिपत्रक
नागरिकांवरील दुहेरी करभार टाळण्यासाठी तात्काळ जारी करावे. मागील अधिवेशनातील आश्वासनानुसार PMC कडून परिपत्रक जारी न झाल्याने नागरिकांची अडचण वाढली आहे.
गुंठेवारी कायदा
सामान्य नागरिकांच्या व्यवहारांसाठी सुलभ अंमलबजावणी, प्रलंबित व्यवहार नियमित करण्यासाठी लवचिक, व्यवहार्य पद्धतीची अंमलबजावणी आवश्यक.
BDP झोन
किमान १६% बांधकाम परवानगी देऊन विकासाला गती देणे कडक निर्बंधांमुळे अडलेल्या विकास प्रक्रियेला चालना आवश्यक.
अतिवृष्टी नुकसान
आश्वासित ७५ कोटींचा निधी तातडीने वितरित करावा. संरक्षण भिंती कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले असून पुनर्बांधणीची कामे प्रलंबित आहेत.
सिंहगड किल्ला
पाणीपुरवठा योजनेसाठी १०–२० कोटींचा निधी मंजूर करावा. पर्यटकांची वाढती संख्या पाहता पाणीपुरवठा समस्या सोडविणे अत्यावश्यक आहे.
DP रस्ते
भूसंपादनासाठी ‘क्रेडिट बॉण्ड पॉलिसी’ लागू करावी किंवा थेट निधी द्यावा. योग्य मोबदला मिळाल्यास भूसंपादन प्रक्रिया गतीमान होऊन वाहतूककोंडी कमी होईल.
खडकवासला मतदार संघातील 32 समाविष्ट गावांच्या विकासास विलंब झाल्यास हा न सोसणारा विषय आहे. पाणी, रस्ते, ड्रेनेज मलनिस्सारण, भूसंपादन, या सर्व मूलभूत सुविधांसाठी तातडीने स्वतंत्र निधी मंजूर करणे आवश्यक असल्याचे तापकीर म्हणाले. शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.