Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satej Patil: “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष…”; ‘गोकुळ’बाबत काय म्हणाले सतेज पाटील?

आम्ही दूध दरवाढीचा जो शब्द दिला होता त्याप्रमाणे दरवाढ केली आहे. गोकुळ कोणाच्या हातात असलं तर टँकर कोणाचे लागणार हे शेतकऱ्यांना माहिती आहे, असे सतेज पाटील म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 16, 2025 | 05:19 PM
Satej Patil: "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष..."; 'गोकुळ'बाबत काय म्हणाले सतेज पाटील?

Satej Patil: "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष..."; 'गोकुळ'बाबत काय म्हणाले सतेज पाटील?

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे नेते आणि कॉँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आज गोकुळ दूध संघाच्या विषयावर भाष्य केले आहे. महाविकास  आघाडी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आणि कारखान्याची निवडणूक यावर देखील भाष्य केले आहे. आमदार सतेज पाटील पत्रकार परिषदेत नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

आमदार सतेज पाटील गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, “हे कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घातले असे मला वाटत नाही. फॉर्मुल्यानुसार दोन दोन वर्ष ठरलं होतं. 15 मे पर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा होती. अजूनही अपेक्षा आहे.”

“महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती. गोकुळमध्ये मी आणि हसन मुश्रीफ एकत्र आहोत. मात्र आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत.  सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते. हसन मुश्रीफ ,प्रकाश आबिटकर ,नरके हे सर्वजण महायुतीचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असावी”, असे सतेज पाटील म्हणाले.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचं राजकारण तापलं; राजीनामा न देण्याचे फडणवीसांचे अरुण डोंगळेंना आदेश

“धनंजय महाडीक यांना याबबतीत कमी ज्ञान आहे. भीमा कारखान्याचे क्रशिंग किती झाल आहे, हे त्यांनी सांगितलं तर कोल्हापुरातील सहकाराला त्यांचे मार्गदर्शन होईल. लोकशाहीमध्ये होणाऱ्या निवडणुका या टेस्टसारख्या असतात. पुढच्या वर्षी जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुका होणार आहेत. सहा महिन्यात नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक होणारआहे. जनता आपला कौल देत असते.”

पुढे बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, ” आम्ही दूध दरवाढीचा जो शब्द दिला होता त्याप्रमाणे दरवाढ केली आहे. गोकुळ कोणाच्या हातात असलं तर टँकर कोणाचे लागणार हे शेतकऱ्यांना माहिती आहे. अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही. सामंजस्याने प्रश्न मिटेल असे मला वाटते.

राजीनामा न देण्याचे फडणवीसांचे अरुण डोंगळेंना आदेश

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचं राजकारण चांगलंच तापले आहे. गोकुळ दूध संघातील सत्तेच्या चाव्या महायुतीकडे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. गोकुळ संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने २५ वर्षांची महाडिकांची सत्ता घालवून मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये वर्चस्व निर्माण केलं होते. मात्र, निवडणुकीनंतर चार वर्षांनी आता महायुतीचाच अध्यक्ष व्हावा, यावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या वर्चस्वाला हादरा बसला आहे.

Web Title: Mla satej patil statement on gokul milk association kolhapur politics marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • Dhananjay Mahadik
  • kolhapur news
  • Satej Patil

संबंधित बातम्या

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी
1

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना
2

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा
3

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला; त्र्यंबोली मंदिरात होणाऱ्या कोहळा फोड सोहळ्याची काय आहे आख्यायिका  ?
4

अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला; त्र्यंबोली मंदिरात होणाऱ्या कोहळा फोड सोहळ्याची काय आहे आख्यायिका ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.