Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी शंकर जगताप सज्ज; 48 तारांकित प्रश्नांची यादी तयार

अधिवेशनाचा कालावधी कमी असला, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप सज्ज झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 05, 2025 | 05:48 PM
हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी शंकर जगताप सज्ज; 48 तारांकित प्रश्नांची यादी तयार

हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी शंकर जगताप सज्ज; 48 तारांकित प्रश्नांची यादी तयार

Follow Us
Close
Follow Us:
  • अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी शंकर जगताप सज्ज
  • 48 तारांकित प्रश्नांची यादी तयार
  • अनेक मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधणार
पिंपरी : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोमवार, ८ डिसेंबरपासून सुरू होत असून, यावेळी ते केवळ आठ दिवस म्हणजे १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांच्या संभाव्य कार्यक्रमामुळे २२ तारखेपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, असे मत भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात व्यक्त केले. अधिवेशनाचा कालावधी कमी असला, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप सज्ज झाले आहेत. त्यांनी ४८ तारांकित प्रश्नांची यादी तयार केली असून, शहराच्या विकासाशी निगडित अनेक मुद्द्यांवर ते सरकारचे लक्ष वेधणार आहेत.

औद्योगिक सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर

शहरातील औद्योगिक परिसरात होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांचे सर्वंकष सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी आमदार जगताप लक्षवेधी सूचनेद्वारे करणार आहेत. तसेच अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सक्षम प्रशिक्षण प्रणाली उभारण्याचाही मुद्दा ते मांडणार आहेत. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक, सुरक्षाविषयक अडचणी आणि आयटीयन्सच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही ते करणार आहेत.

महानगरातील महत्त्वाचे प्रकल्प आणि प्रशासकीय प्रश्नांवर भर

पवना नदी सुधार प्रकल्प, पिंपरीचा आरोपीबंध मंजुरी, अवजड वाहनांमुळे होणारे अपघात, फास्ट ट्रॅक लेबर कोर्ट, लिफ्ट सुरक्षा आणि शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची तातडीची गरज यावर जगताप अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहेत. तसेच पीएमआरडीकडील भूखंडांच्या लिलावाला स्थगिती देणे, काळेवाडी–हिंजवडी–बिजलीनगर महावितरण शाखांचे विभाजन, वंचित विद्यार्थ्यांची १२६ कोटींची थकीत महाज्योती छात्रवृत्ती तातडीने मंजूर करणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा चुकीचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याची मागणी हे महत्त्वाचे मुद्दे असतील.

आरोग्य, शिक्षण आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रश्न

रुबी हॉलच्या किडनी रोपण घोटाळ्याची चौकशी, औंध जिल्हा रुग्णालयातील बंद एमआरआय सुविधा, कुपोषित बालकांसाठी पोषक आहार पुरवठ्याची चौकशी, सांगवी जिल्हा रुग्णालयात फॉरेन्सिक डॉक्टरची नियुक्ती, राज्यातील १२ हजारांहून अधिक रिक्त प्राध्यापक पदांच्या भरतीची मागणी हे मुद्देही ते उपस्थित करणार आहेत. पिंपरीतील न्यायालयीन सोयीसुविधांचा अभाव दूर करण्यासाठी वाकड–हिंजवडी परिसरातील खटले पिंपरी न्यायालयात वर्ग करणे, तसेच महापालिका रुग्णालयांत कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्याची मागणीही अधिवेशनात मांडली जाईल.

नागरिकांच्या दैनंदिन अडचणींबाबतही मागण्या

टीओडी वीजमीटरशी संबंधित तक्रारी, शिधापत्रिका केवायसी प्रलंबितामुळे नागरिकांना होणारी गैरसोय, गृहनिर्माण सोसायट्यांमधील लिफ्ट सुरक्षा, प्राधिकरणातील नागरिकांना सातबारा व प्रॉपर्टी कार्ड वितरण या विषयांवरही जगताप यावेळी ठोस भूमिका मांडणार आहेत. अल्प कालावधीचे अधिवेशन असले तरी शहराचे दीर्घकालीन आणि तातडीचे प्रश्न उपस्थित करून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mla shankar jagtap is ready to raise questions in the winter session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • BJP
  • BJP city president Shankar Jagtap
  • CM Devedra Fadnavis

संबंधित बातम्या

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर
1

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त
2

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
3

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  
4

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.