Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यानंतर साताऱ्यातही मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक; अनेक दुकानांच्या पाट्यांना फासले काळे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने सातारा शहरातील काही दुकानांना मराठी नावांच्या मुद्द्यावरून पुन्हा काळे फासण्यात आले. हॉटेल प्रीती एक्झिक्युटीव्ह परिसरातील काही दुकानांवर धडक काळे फासण्याची कारवाई सुरू झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 01, 2023 | 03:02 PM
पुण्यानंतर साताऱ्यातही मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक; अनेक दुकानांच्या पाट्यांना फासले काळे
Follow Us
Follow Us:

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने सातारा शहरातील काही दुकानांना मराठी नावांच्या मुद्द्यावरून पुन्हा काळे फासण्यात आले. हॉटेल प्रीती एक्झिक्युटीव्ह परिसरातील काही दुकानांवर धडक काळे फासण्याची कारवाई सुरू झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार (Yuvraj Pawar) यांच्यासह 15 जणांची धरपकड केली.

महाराष्ट्रामध्ये सर्व आस्थापनांची नावे तसेच दुकानांच्या पाट्या या मराठी भाषेतून असाव्यात या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही सातारा शहरातील व्यापारी दुकानदार यांच्याकडून या नियमाची अंमलबजावणी होत नाही. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीने जिल्हा प्रशासन तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालय यांना निवेदन सादर केले होते आणि कठोर आंदोलनाचा इशारा दिला होता.

शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 40 ते 50 आंदोलकांनी अचानक आक्रमक पवित्रा घेत हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह परिसरातील काही दुकानांच्या पाट्यांना काळे फासले.

आंदोलनाची माहिती मिळताच सातारा पोलीस तत्काळ या परिसरात दाखल झाले. त्यांनी पवार यांच्यासह सुमारे 15 जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी सातारा शहर पोलीस ठाण्यात केली. मात्र, जोपर्यंत सातारा शहरातील आस्थापनांच्या पाट्या संपूर्णपणे मराठीत होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अशाच तीव्र स्वरूपाचे होणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी दिला.

Web Title: Mns aggressive over shops marathi name plate issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2023 | 03:02 PM

Topics:  

  • Maharashtra Navnirman Sena
  • Name plate
  • political news

संबंधित बातम्या

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
1

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
2

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
3

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
4

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.