Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. शिवरायांना जलाभिषेक करून मनसे कार्यकर्ते पुढे सरसावल्याचे दिसून आले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 17, 2025 | 11:30 AM
अमित ठाकरेंच्या हस्ते शिवस्मारकाचे अनावरण

अमित ठाकरेंच्या हस्ते शिवस्मारकाचे अनावरण

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवरायांना जलाभिषेक
  • पोलिसांना मागे सारत मनसे कार्यकर्ते सरसावले
  • अमित ठाकरे यांनी केले अनावरण 
नवी मुंबईः नेरूळ सेक्टर १ डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय समोरील शिवरायांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. महाराजांची मूर्ती ठेवून ती कापडात गुंडाळण्यात आली आहे. निवडणुकांत अनेक लोकोपयोगी कामांचे श्रेय मिळविण्यासाठी त्याचे उद्घाटन आपल्या हातून व्हावे यासाठी शिवरायांची मूर्ती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत अडकली आहे. ‘शिवराय अडकले उद्घाटनाच्या श्रेयवादात’ अशा आशयाचे वृत्त दै. ‘नवराष्ट्र’ने प्रसिद्ध केले होते. त्या वृत्तास शिवप्रेमींनी भरभरून दाद देत पालिकेकडून होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली होती. 

अखेर रविवारी मनसेच्या शाखांच्या उद्घाटनासाठी नवी मुंबईत आलेल्या अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसैनिकांनी गुंडाळून ठेवलेली महाराजांची मूर्ती मुक्त करत, त्यास जलाभिषेक घालत, हळद कुंकवाने पूजा करत, हर घालून फुले वाहत या मूर्तीचे अनावरण केले. पोलिसांनी मनसैनिकांना अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फोल ठरला. यानंतर शिवरायांच्या मुद्द्यावरून नवी मुंबईतील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवराय अडकले उ‌द्घाटनाच्या श्रेयात

नेरूळ सेक्टर १ राजीव गांधी उड्डाणपूलसमोर आलेल्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे संबोधण्यात येते. मात्र या चौकात छत्रपतींची मूर्ती मात्र उभारली गेलेली नाही. ही बाब लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते देवा म्हात्रेनी सातत्याने पालिका ते जिल्हाधिकारी असा पाठपुरावा करत या ठिकाणी छत्रपतींची मूर्ती उभारण्याचे शिवप्रेमींचे स्वप्न पूर्ण केले. मात्र पालिकेकडून या कामास सातत्याने विलंब केला जात होता. सहज होणारी कामे हत्तीच्या गतीने सुरू ठेवत काम रखडवल्याचा आरोप पालिकेवर होत होता.

Navi Mumbai : शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट; शिवरायांच्या मूर्तीवरुन श्रेयवाद, उद्घाटनासाठी पालिकेला मुहूर्त मिळेना

शिवरायांचे स्मारक होते उद्घाटनाच्या प्रतिक्षेत…

विधानसभा निवडणुकांच्या आधी हे काम पूर्ण होऊन शिवरायांच्या स्मारकाचे थाटामाटात उद्घाटन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र कामास विलंब झाल्याने शिवप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. मात्र आता पालिका निवडणुकांचा कालावधी आहे. अशात शहरातील लोकार्पण सत्ताधारी पक्षातील नेते करत असतात. त्यानुसार शहरातील इतर् वास्तूंसोबत शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन देखील यात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

मनसेचा गनिमी कावा, सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळले

सत्ताधारी व पालिका प्रशासनाकडून होणारा विलंब आणि शिवप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरल्याचे पाहून अखेर मनसे नेते अमित ठाकरेंनी या पुतळ्याचे अनावरण करून एकप्रकारे गनिमी कावा करत सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळल्याचे या अनावरणाने दिसून आले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह मनसैननिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केला आहे.

Navi Mumbai: शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीची होणार स्थापना; नेरूळमध्ये अवतरली शिवशाही

या पुतळ्याचे उद्घाटन कोणीही केले तरी हरकत नाही. मात्र अमित ठाकरेंनी ही बाब नागरिकांना सांगणे आवश्यक होते. किमान ते थाटामाटात केले असते, आम्ही शिवोमी म्हणून सामील होऊ शकलो असतो. सर्वच शिप्रेमींची ती इच्छा होती. अद्याप सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे मेघडंबरीला रंग लावणे बाकी आहे. मी अमित ठाकरे यांना याच विषयावरून जाब विचारला  – देवा म्हात्रे, शिवरायांच्या मूर्तीसाठी पाठपुरावा करणारे, सामाजिक कार्यकर्ते, नेरूळ नेरूळ येथील शिवसृष्टी अनेक महिन्यांपासून तयार आहे. पण महाराजांचा पुतळा धुळीने माखलेल्या कपड्याने बंदिस्त होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टीची ही एक प्रकारे विटंबना होती. शेकडो शिवप्रेमीनी शिवसृष्टी सर्वसामान्यांसाठी खुली केली, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना महाराजांच्या पुतळा लोकार्पणासाठी वेळ नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यामुळे माझ्यावर कारवाई झाली तरी हरकत नाही. महाराजांसाठी अशा अनेक केसेस घेण्याची तयारी आहे. – अमित ठाकरे, मनसे नेते याबाबत आयुक्तांना पत्र दिले होते, वारंवार अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. जर आम्ही अनावरण करणार हे जाहीर केले असते तर, इथे १०० ते २०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असता. त्यामुळे गनिमी काव्याने हे काम आम्ही फत्ते केले, राजकीय नेत्यांच्या श्रेयवादात शिवरायांना अडकवणे योग्य नाही. याबावत पोलिसांनी पालिकेला जनभावना लक्षात घेऊन या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी पत्र दिल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तरीही पालिकेकडून विलंब केला जात आहे – गजानन काळे, मनसे शहराध्यक्ष, नवी मुंबई

Web Title: Mns amit thackeray unveiled shiv smarak at navi mumbai navarashtra news impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • amit thackeray
  • MNS
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ
1

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ

Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय
2

Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय

Navi Mumbai: नववर्ष स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त, 2500 पोलीस तैनात
3

Navi Mumbai: नववर्ष स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त, 2500 पोलीस तैनात

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी
4

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.