मुंबई रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ हवं, मनसेची मागणी; उद्याच मोर्चा धडकणार
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रानजीक लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी आहेत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातानंतर राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून उद्या १० जून रोजी रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील वाढती गर्दी आणि रेल्वे प्रशासनांचं वास्तव माध्यमांसमोर मांडलं आहे. दरम्यान मनसेने घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या जाहीर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली असून उद्या सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.राज
मुंबईत रेल्वेने बराच काळ मी स्वतः प्रवास केला आहे. पण त्यावेळची परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून भीती वाटते. आपले खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात, तिथून काहीतरी शिकून येतात की नाही? परदेशात अशी घटना घडली, तर तिथे परिस्थिती कशी हाताळली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला कसलीही किंमत नाही, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या निषेधार्थ रेल्वे प्रशासनावर मनसे धडक मोर्चा काढणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा असणार आहे. या सर्व परिस्थितीतू प्रवाशांना आणि नागरिकांना बाहेर पडायचं असेल तर मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे.
Sanjay Nirupam : “निवडणूक निकालांवर संशय घेणं हा बालिशपणा,” संजय निरुपम यांची राहुल गांधीवर टीका
मुंब्रा स्थानकानजीक घडलेली आजची घटना वेदनादायक आहे. घटनेनंतर आम्ही आज रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली असून उद्या ठाण्यामध्ये धडक मोर्चा येतोय. त्यावेळी बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात रेल्वे अधिकाऱ्यांची यांची भेट घेणार आहे. अशा घटना कशा रोखता येतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमचं इंजिन आता रेल्वे प्रशासनाला जोडावं लागणार आहे, असं मनसेच्या रेल्वे कामगार सेनेनं म्हटलं आहे.