Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण- शीळ रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल सगळा आनंदी आनंदच आहे, मनसे आमदार राजू पाटील यांची टीका

कल्याण-शीळ हा रस्ता चार पदरी रस्ता होता. हा रस्ता सहा पदरी सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या कामातील 20 टक्के जागा अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. संपादनाचा मोबदला मिळाला नसल्याने या कामात अडसर आहे. रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम 80 टक्के पार पडले आहे. या रस्ते विकास कामाविषयी मनसे आमदार पाटील यांनी वारंवार टीका केली आहे.

  • By साधना
Updated On: Feb 03, 2023 | 06:58 PM
कल्याण- शीळ रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल सगळा आनंदी आनंदच आहे, मनसे आमदार राजू पाटील यांची टीका
Follow Us
Follow Us:

कल्याण: कल्याण शीळ रस्त्याच्या (Kalyan Shil Road) गुणवत्तेबद्दल वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी 5 मार्च 2022 ला तक्रार केल्यानंतर व्हीजेटीआयने (VJTI) ऑडीट केल्यानंतर 30 पॅनल बदली करणे, 64 ठिकाणी तडे गेलेले पॅनल दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काम चालू आहे. मात्र 21 किलोमीटर रस्त्याच्या गुणवत्तेविषयी आनंदी आनंदच आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी  केली आहे. याआधीही अनेकदा या रस्त्याविषयी राजू पाटील यांनी तक्रार केली होती. आताही त्यांनी रस्त्याच्या गुणवत्तेवर बोट ठेवलं आहे. टक्केवारीचा हॅशटॅग टाकून रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या रस्ते कामातील भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी सडेतोड टिका केली आहे. सत्ताधाऱ्यांची कॉन्ट्रॅक्टरसोबत भागीदारी आहे. त्यामुळे त्याच्यावर कुणाचा अंकुश नाही असे बोलले जाते.

कल्याण-शीळ रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल तक्रार केल्यावर VJTI ने ॲाडिट केल्यानंतर १० कि.मी. मधले ३० पॅनल बदली करणे व ६४ तडे गेलेले पॅनल दुरूस्त करण्याच्या सुचना दिल्या होत्या, त्यानुसार काम चालू आहे. परंतु एकंदरीतच ह्या एकुण २१ कि.मी. रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल आनंदी आनंदच आहे. #टक्के pic.twitter.com/YLQhz51wMz — Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) February 3, 2023

कल्याण-शीळ हा रस्ता चार पदरी रस्ता होता. हा रस्ता सहा पदरी सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या कामातील 20 टक्के जागा अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. संपादनाचा मोबदला मिळाला नसल्याने या कामात अडसर आहे. रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम 80 टक्के पार पडले आहे. या रस्ते विकास कामाविषयी मनसे आमदार पाटील यांनी वारंवार टीका केली आहे. विधानसभेतदेखील या मुद्द्यावर त्यांनी प्रश्न घेतला होता. स्थानिक नागरिक आणि वाहन चालक या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नेहमी तक्रार करत असतात. या रस्त्याच्या कामामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि राज्य रस्ते विकास महामंडळास याबाबत धारेवर धरले आहे.

या रस्ते कामासंदर्भात मनसे आमदार पाटील यांनी तक्रार केल्यानंतर व्हीजेटीआय या संस्थेकडून ऑडीट करण्यात आले होते. दहा किलोमीटरच्या अंतरावरील 30 पॅनल दुरुस्ती आणि 64 ठिकाणी तडे गेलेल्या पॅनल दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. अजून 21 किलोमीटर रस्त्याच्या कामाविषयी काही एक माहिती दिली गेलेली नाही. या 21 किलोमीटर अंतरातही सगळे काही आलबेल असल्याने त्याविषयी उपाहासात्मक सवाल पाटील उपस्थित केला आहे. या रस्ते विकास कामात भ्रष्टाचार झाला आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे.

Web Title: Mns mla raju patil comment about kalyan shil road nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 06:56 PM

Topics:  

  • Marathi News
  • mns news
  • mns raju patil

संबंधित बातम्या

तुमच्या Loan च्या EMI बाबत RBI ची मोठी घोषणा! Repo दराबाबत आली महत्त्वाची अपडेट
1

तुमच्या Loan च्या EMI बाबत RBI ची मोठी घोषणा! Repo दराबाबत आली महत्त्वाची अपडेट

Foreign Tourist Controversy : संतापजनक! बाजारात परदेशी नागरिकाचा धुडगूस; भाजीपाला हवेत फेकला अन् मोठ्यामोठ्याने…VIDEO VIRAL 
2

Foreign Tourist Controversy : संतापजनक! बाजारात परदेशी नागरिकाचा धुडगूस; भाजीपाला हवेत फेकला अन् मोठ्यामोठ्याने…VIDEO VIRAL 

Vikram Kakade Net Wort: आलिशान बोटी, जय पवारांना १० कोटींचे कर्ज…; विक्रम काकडेंची संपत्ती पाहून बसेल धक्का
3

Vikram Kakade Net Wort: आलिशान बोटी, जय पवारांना १० कोटींचे कर्ज…; विक्रम काकडेंची संपत्ती पाहून बसेल धक्का

इंडिया पोस्ट आणि कव्हरश्युअरचा मोठा उपक्रम; अंतर्देशीय पत्राद्वारे आता घरोघरी पोहोचणार विमा साक्षरतेचा संदेश!
4

इंडिया पोस्ट आणि कव्हरश्युअरचा मोठा उपक्रम; अंतर्देशीय पत्राद्वारे आता घरोघरी पोहोचणार विमा साक्षरतेचा संदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.