' जिथे असशील तिथून उचलणार', सोशल मीडियावर धमकी; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याने दिलं खुलं आव्हान
राज्यात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार आहे. त्याआधी भाजप देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर धमकी दिली आहे. मोहित कंबोज या ना त्या कारनाने सोशल मीडियावर चर्चेत असतात आता या धमकीमुळे चर्चेत आले आहेत. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्याने अशा धमक्यांना महाराष्ट्र भीक घालत नाही, असं म्हणत खुलं आव्हान दिलं आहे. दरम्यान कंभोज यांच्या या धमकीच्या पोस्टमुळे खळबळ माजली आहे.
मोहीत कंभोज यांनी कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या एका एक्स हँडलला टॅग करून धमकी दिली आहे. कंबोज यांनी त्या पोस्टमध्ये , “माझं पुढील टार्गेट, गजाभाऊ! पृथ्वीवर कुठेही असलास तरी तिथून तुला उचलणार! हर हर महादेव!” असं म्हटं आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान अंबादास दानवे यांनी या धमकीचा निषेध केला असून फिकर नॉट असं म्हटलं आहे.
My next target @gajabhauX !
धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे !
हर हर महादेव 🙏
Save the tweet 🐥— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) December 1, 2024
या असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे ‘कंभोजीकरण’ झाले आहे. तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज ‘ह्याला उचल, त्याला उचल’ची भाषा करतो जे यांना अजिबात शोभत नाही.. महाराष्ट्रात अश्या धमक्यांना थारा नाही, मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही! फिकर नॉट @gajabhauX असं म्हटलं आहे.
या असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे ‘कंभोजीकरण’ झाले आहे. तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज ‘ह्याला उचल, त्याला उचल’ची भाषा करतो जे यांना अजिबात शोभत नाही.. महाराष्ट्रात अश्या धमक्यांना थारा नाही, मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही! फिकर नॉट @gajabhauX https://t.co/7eVN6D4m5C
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 3, 2024
मोहित कंभोज यांनी ज्या गजाभाऊला टॅगकरत धमकी दिली आहे, तो गाजाभाऊ गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरील एक्स हँडल सक्रीय आहे. अनेक विषयांवर भाष्य करुन तो सोशल मीडियावर तुफान चर्चेत असतो. इतकंच नाहीत तर तर त्याच्या प्रत्येक विधानावरून नवीन वादाला तोंड फुटतं असतं. या हँडलवरुन भाजप आणि महायुतीमधील घटक पक्षांवर सतत टीका केली जाते. गजाभाऊ या हँडलवर आपली ओळख करून देताना, तो जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँगचा असल्याचं म्हटलं आहे. खरं हा एक्स हँडल व्हेरीफाइड नसून यावरील पोस्टनंतर अनेक वाद उफाळून आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आता मोहित कंबोज आणि गजाभाऊ यांच्या धमकीचं सत्र सुरु झालं असून त्याला अंबादास दानवे यांनी उत्तर दिल आहे.