Bangladesh Politics : बांगलादेशच्या राजकारणात खळबळ! शेखी हसीना पुन्हा सत्तेत येणार? युनूसची वाढली चिंता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangladesh News in Marathi : ढाका : बांगलादेशच्या (Bangladesh) राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) पुन्हा बांगलादेशा परतणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यासाठी एका खास व्यक्तीने योजना आखण्यास आणि बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. यामुळे अंतिम सरकारचे मोहम्मद युनूस (Mohammad Yunus) बिथरले आहेत.
भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून
मिळालेल्या माहितीनुसार, एस. आलम ग्रुपचे अध्यक्ष सैफुल्लाह आलम मसूद शेख हसीना यांना बांगलादेशात पररत आणण्याची योजना आखत आहे. यासाठी त्यांनी सौदी, अरेबिया, दुबई आणि मुबंईचा दौराही केला आहे. सांगितले जात आहे की, देशात पुन्हा एकदा अवामी लीगची सत्ता स्थापन करण्यासाठी या भेटी होत आहे. २०२४ च्या सत्तापालटानंतर हसीन भारतात राहत होत्या. यामुळे मसूद यांच्या दिल्ली बैठकीवर प्रश्न उपस्थित केले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सैफुल्लाह मसूदने सौदी अरेबियाला २ ऑगस्ट रोजी भेट दिली होती. यावेळ तिथे देशाबाहेरील अवामी लीगच्या नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. मक्का येथील क्लॉक टॉवर हॉटेलमध्ये ही बैठक झाली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी मसूद यांनी भारतात शेख हसीना यांचीही भेट घेतली आहे. तसेच फरार अवामी नेत्यांचीही मसूदने भेट घेतली आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध ओबेरॉय हॉटेलमध्ये ही भेट झाली असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच मसूद यांनी गुप्तपणे लुटियन्स झोनमध्ये शेख हसीनालाही भेट दिली आहे. ही बैठक सुमारे साडेपाच तास सुरु होती. यामध्ये कोटींच्या रुपयांवर चर्चा झाली. याचा वापर आंतरराष्ट्रीय लॉबिंग, राजकीय कार्यक्रम आणि संघटानांसाठी केला जाऊ शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
याच वेळी बांगलादेशातून आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. बांगलादेशमध्ये तुरुंग व्यवस्थेचा एक मोठा गोंधळ समोर आला आहे. येथील विविध तुरुंगांमधून २,७०० हून अधिक कैदी फरार झाले असून, त्यापैकी सुमारे ७०० कैदी अद्यापही बेपत्ता आहेत. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये अनेक कुख्यात गुन्हेगार आणि धोकादायक दहशतवाद्यांचा समावेश असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
जुलै २०२४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या जोरदार निदर्शनांदरम्यान आणि हिंसाचाराच्या काळात अनेक तुरुंगांमधील सुरक्षा व्यवस्था कोलमडली होती. या गोंधळाचा फायदा घेत मोठ्या संख्येने कैदी पळून गेले.
भारताच्या शेजारील देशातून २७०० कैदी फरार, ७०० अजूनही बेपत्ता; प्रशासन हादरले