Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहिते-पाटील- शरद पवार यांच्या भेटीने तर्कवितर्क; धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून लढणार ?

धैर्यशील मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यातच, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची पुण्यात भेट झाल्यानंतर करेक्ट कार्यक्रम झाल्याचं बोललं जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 30, 2024 | 09:51 AM
मोहिते-पाटील- शरद पवार यांच्या भेटीने तर्कवितर्क; धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून लढणार ?
Follow Us
Follow Us:

अकलुज : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी कधीकाळी लढवलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाकडे सध्या राज्याचं लक्ष लागले आहे. माढ्यातून भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या उमेदवारांना सोलापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात प्रभाव असलेल्या मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तर, धैर्यशील मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यातच, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची पुण्यात भेट झाल्यानंतर करेक्ट कार्यक्रम झाल्याचं बोललं जात आहे.

भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अकलूजचे मोहिते पाटील नाराज आहेत. दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रात भाजपला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

पुण्यातील कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्नसोहळा बुधवारी झाला. या लग्नसोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यावेळी शरद पवार, संजय राऊत, हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील शेजारी बसले होते. या सोहळ्यात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात चर्चा होत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.

दरम्यान, माढा मतदारसंघातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनीही विरोध केला होता, तर काही दिवसांपूर्वी अकलूज येथे मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील नेते रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांनीही बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मोहिते पाटील वेगळा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

व्हिडिओमुळे ‘अंदर की बात’ बाहेर

अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार असून, या भेटीनंतर पक्ष प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. जयसिंह पाटील यांच्या व्हिडिओमुळे ही अंदर की बात बाहेर आली. मात्र, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आजच्या भेटीतच सर्वकाही ठरल्याचंही आता बोललं जात आहे.

जयसिंहांच्या विधानानंतर भेटीची चर्चा

जयसिंह मोहिते पाटील यांच्या विधानाला आजची भेटही तितकीच कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी अकलूजमध्ये जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. तर, अद्यापही महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Mohite patil sharad pawars meeting and discussion will mohite patil fight from mahavikas aghadi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2024 | 09:51 AM

Topics:  

  • BJP
  • Election
  • Madha Lok Sabha
  • maharashtra

संबंधित बातम्या

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका
1

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
2

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
3

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
4

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.