Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनसिंग परिसरात पेरण्या अंतिम टप्यात! विवंचनेत सापडलेल्या बळीराजा दिलासा

आर्द्रा नक्षत्रातील दमदार पावसामुळे वाशिमच्या अनसिंग परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मृग नक्षत्रात पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या पेरण्या रखडल्या होत्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2026 | 08:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम लांबणीवर जाण्याची चिंता अनसिंग परिसरातील शेतकऱ्यांना सतावत होती. मात्र, आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील खरीप पेरण्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत.

‘शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज पोहोचवण्यात सहकाराची भूमिका महत्त्वाची’; आंतरराष्ट्रीय सहकार दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतातील जमीन कोरडी पडली होती. त्यामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे शिवारातील धुळीचे साम्राज्य संपुष्टात आले आणि जमिनीत पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाला. यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेताचा रुख केला.

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा वेगळाच पॅटर्न पाहायला मिळत आहे. दिवसभर पाऊस उघडीप देत असला, तरी सायंकाळच्या सुमारास दमदार सरी कोसळत आहेत. या वातावरणाचा फायदा घेत शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. कुठे बैलजोडीच्या साहाय्याने, तर कुठे ट्रॅक्टर आणि आधुनिक टोकण यंत्राच्या मदतीने सोयाबीन, कापूस आणि तुरीची पेरणी वेगाने सुरू आहे.

सध्या अनसिंग आणि परिसरातील बहुतांश शेतांमध्ये पेरणी पूर्ण झाली असून, उर्वरित कामही अंतिम टप्प्यात आहे. येत्या एक-दोन दिवसांत जवळपास १०० टक्के पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वेळेत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान दिसून येत आहे.

ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नव्याने पेरणी केलेल्या पिकांना आवश्यक ओलावा मिळण्याची शक्यता असून, यंदाचा खरीप हंगाम चांगला होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. मृग नक्षत्राने निराशा दिली असली, तरी आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने बळीराजामध्ये नव्या आशा निर्माण केल्या आहेत. आता वेळेवर पाऊस कायम राहिल्यास यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Sowing operations in the ansing area washim are in the final stages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news

संबंधित बातम्या

रिसोडमध्ये ‘श्रीं’च्या पालखीचे जल्लोषात स्वागत; ७०० वारकऱ्यांना महाप्रसाद, आज सेनगावकडे प्रस्थान
1

रिसोडमध्ये ‘श्रीं’च्या पालखीचे जल्लोषात स्वागत; ७०० वारकऱ्यांना महाप्रसाद, आज सेनगावकडे प्रस्थान

Buldhana News : पावसाची संथ गती, टंचाईची तीव्रता कायम! पेरण्यांची गतीही चांगली मंदावली
2

Buldhana News : पावसाची संथ गती, टंचाईची तीव्रता कायम! पेरण्यांची गतीही चांगली मंदावली

Buldhana News : मुलीला पळवून नेल्याचा आरोप; आरोपीला पोलिसांकडून संरक्षण? बुलढाण्यात पालकांचे आमरण उपोषण
3

Buldhana News : मुलीला पळवून नेल्याचा आरोप; आरोपीला पोलिसांकडून संरक्षण? बुलढाण्यात पालकांचे आमरण उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.