
MP Amol Kolhe letter to Forest Department regarding Pimparkhed leopard attack Shirur News
Pune News: शिरुर: अनेक भागांमध्ये बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे दिसून येते. जुन्नरनंतर शिरुरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याचा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त केला आहे. पिंपरखेड येथे काल (दि.०3) रोहन विलास बोंबे या 10 वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळे गावावर शोककळा पसरली असून मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीय आणि गावकरी संतप्त झाले.
बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्या मुलाचा नाहक मृत्यू झाल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तब्बल सात तास तीव्र आंदोलन केले. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर काल स्थानिक नागरिकांनी, ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, पहिले बिबट्याचा बंदोबस्त करा नंतरच अंत्यविधी करू अशी भूमिका घेतली होती त्यामुळे वातावरण तापले होते. एवढंच नव्हे तर या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन आणि कार्यालय पेटविले. या आंदोलनाला हिंसक वळण आल्यानंतर सदर बिबट्याला मारण्याचा आदेश देण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बिबट्याने हल्ला केलाच्या या घटनेवरुन पार्श्वभूमीवर मंचरमध्ये आज पुन्हा पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे. आमदार शरद सोनावणे देखील उपस्थित राहतील. यावेळी या भागातील सर्व गावंही बंद राहणार आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी जाळीत वनविभागाचं कार्यालय पेटवून देत संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांकडून बेल्हे जेजुरी महामार्गावरील पंचतळे आणि अष्टविनायक महामार्गावरील रोडेवाडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तीन तासांपासून महामार्ग रोखल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करा अशी मागणी करत नागरिक आक्रमक झाले होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जांबूत, पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे केली. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून खासदार अमोल कोल्हे यांनी तातडीने पत्र लिहिले होते. पिंपरखेड येथे अवघ्या 10 दिवसांत दोन लहानग्या निष्पाप जीवांचा बळी गेला, तर महिनाभरात ही तिसरी घटना घडली. असे असूनही राज्य सरकार उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याकडे दुर्लक्ष करीत आहे, ही अतिशय चीड आणणारी बाब असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटले. भरदिवसा माता-भगिनी आणि लेकरांचा बळी जात असताना सरकार निष्ठूरपणे बघत आहे. त्यामुळेच आज नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की, यापुढे एकही क्षण न दवडता आमच्या जिवाभावाच्या माणसांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.