Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीरा देवघरच्या पाण्यासाठी रास्ता रोको; खासदार मोहिते पाटलांनी सरकारला दिला इशारा

गारवाडपाटी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) इथे नीरा देवघर पाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनात खासदार मोहिते पाटील बोलत होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: सप्टेंबर 07, 2025 | 04:58 PM
नीरा देवघरच्या पाण्यासाठी रास्ता रोको; खासदार मोहिते पाटलांनी सरकारला दिला इशारा

नीरा देवघरच्या पाण्यासाठी रास्ता रोको; खासदार मोहिते पाटलांनी सरकारला दिला इशारा

Follow Us
Follow Us:

अकलूज/कृष्णा लावंड : माळशिरस तालुक्यातील 22 गावांच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी नीरा देवघरचे पाणी मिळणे गरजेचे आहे. आम्ही संबंधित विभागाला काम सुरु करण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी देत आहोत. काम सुरु झाले नाही तर मंत्रालयात घुसून आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही. सरकार बहिरे झाले आहे. त्याच्या कानावर शेतकऱ्याची हाक जात नाही. या सरकारला जाग आणण्यासाठी आमचा लढा सुरु असल्याचे मत माढा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

गारवाडपाटी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) इथे नीरा देवघर पाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनात खासदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी आमदार उत्तमराव जानकर, संग्रामसिंह जहागीरदार, शहाजी ठवरे, बाबासाहेब माने, पांडुरंग वाघमोडे, गौतम माने, तुकाराम देशमुख, आप्पा कर्चे, दत्ता मगर, अजय सकट, सादिक सय्यद, सुरेश टेळे, डॉ. मारुती पाटील, विष्णू घाडगे जीवन जाणकर मामा घाडगे व शेकडोच्या संख्येने 22 गावातील नागरिक उपस्थित होते.

मोहिते पाटील पुढे म्हणाले, सरकारकडे हजारो कोटी रुपयांचे रस्ते करण्यासाठी पैसे आहेत. पण शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या नीरा देवघरच्या पाणी योजणेसाठी पैसे नाहीत. गेली 30 वर्षे सरकार माळशिरस तालुक्याला पाणी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. मागील खासदारांनी पैसे मंजुर झाले, आता लगेच काम सुरु होईल म्हणून इथल्या शेतकऱ्यांना गाजर दाखवले. पण या योजनेचे काम काही सुरु झाले नाही. पाणी काही आले नाही. मी आणि आमदार जानकर वाट्टेल ती किंमत मोजू पण तुमच्या शिवारात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.

आमदार जानकर म्हणाले, सरकारला जाग आणण्यासाठी, येथील शेतकऱ्यांची व्यथा, वेदना सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही शिंगोर्णी ते कोथळे अशी 103 किमी पायी संघर्ष यात्रा काढली. या नीरा देवघरच्या पाण्यासाठी मी विधानसभेत प्रश्नही विचारला. निरा देवघरच्या पाण्याच्या प्रकल्पाइतका कोणताही जुना प्रकल्प महाराष्ट्रात मागे राहिला नाही. गोसे खुर्द योजनेला सरकार 30 हजार कोटी रुपये देऊ शकते पण नीरा देवघरच्या प्रकल्पसाठी तुमच्याकडे 2 हजार कोटी रुपये नाहीत. सरकार मुद्दाम मतांच्या राजकारणासाठी हा प्रकल्प रखडवत आहे. पण आम्ही तुमच्या नरड्यात हात घालून डिसेंबर 26 पूर्वी पाणी शिंगोर्णीच्या डोंगरात सोडल्याशिवाय राहणार नाही. असं जानकर म्हणाले.

मान्यता, मंजुरी आणि निधी हा लबाड खेळ खेळत तुम्ही गेली 30 वर्षे येथील शेतकऱ्याला पाण्यापासून वंचित ठेवले आहे. येत्या 50 दिवसात जर या कामाचे टेंडर नाही निघाले तर तुमचे दात कसे पाडायचे ते आम्ही ठरवू. तुमच्या छाताडावर बसून आम्ही या गावात पाणी आणू. आजचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करतो आहोत. पण काम सुरु झाले नाही तर येथील शेतकऱ्यांना घेऊन मंत्रलयात घुसायला कमी करणार नाही, असाही इशारा जानकर यांनी दिला.

या गावांसाठी होतेय पाण्याची मागणी

पिंपरी, फडतरी-निटवेवाडी, लोणंद, लोंढे – मोहितेवाडी, गिरवी, भांब, रेडे, कण्हेर, गोरडवाडी, इस्लामपूर, कारुंडे, कोथळे, चांदापुरी, जळभावी, तरंगफळ, पठाणवस्ती, सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी, गारवाड, झिंजेवस्ती, काळमवाडी व पिलीव.

नीरा देवघर प्रकल्पाचे भोर, खंडाळा, फलटण आणि माळशिरस हे लाभक्षेत्र आहे. प्रकल्प सुरु होऊन कित्येक वर्षे झाली पण अजून याची कामे पूर्ण झाली नाहीत. राजकीय चढ उतार पाहून विविध खात्यामध्ये मंजुरीच्या फाईल अडकून पडल्या आहेत. या प्रकल्पची कामे पूर्ण होताच माळशिरस तालुक्याला 3 टीएमसी पाणी मिळेल अशी आशा आहे.

Web Title: Mp dhairyasheel mohite patil has warned the government on the water issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: सप्टेंबर 07, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Malshiras
  • Solapur

संबंधित बातम्या

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक
1

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न
2

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त
3

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
4

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.