Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी, ‘स्थानिक’च्या निवडणुकीत राज्यात तीन खून; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्या नगरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 10, 2026 | 11:13 AM
सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी, ‘स्थानिक’च्या निवडणुकीत राज्यात तीन खून; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी, ‘स्थानिक’च्या निवडणुकीत राज्यात तीन खून; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी सुरु
  • ‘स्थानिक’च्या निवडणुकीत राज्यात तीन खून
  • हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
अहिल्यानगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरु दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत पण त्याला हरताळ फासला आहे. सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्या नगरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाचे खासदार निलेश लंके, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद अहेर यांच्यासह काँग्रेस आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विरोधकांना प्रचार करता येऊ नये यासाठी सत्ताधारी पक्ष त्यांची कोंडी करत आहे. विरोधपक्षांना हेलिकॉप्टर मिळू नये, प्रचार सभेसाठी मैदाने मिळू नये साठी ती ब्लॉक केली जात आहेत. निवडणुकीत प्रचार एकतर्फी असता कामा नाही, विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. हिंसक घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. उमेदवारांना धमकावण्यासाठी खुलेआम बंदुका, कोयते घेऊन फिरत आहेत. राज्यात अकोट, सोलापूर व खोपोली या ठिकाणी आतापर्यंत तीन खून झाले आहेत, हे लोकशाहीसाठी घातक आहे.

महानगरपालिकांच्या निवडणुका या पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या महत्वाच्या प्रश्नांवर झाल्या पाहिजेत पण भाजपा महायुती मात्र यावर बोलत नाही. महापौर मराठी हवा की ऊर्दू, खान हवा की बाण यावर भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. दुसरीकडे सत्तेतील तिन मित्रपक्षच एकमेकावर आरोप करत आहेत, हे त्यांचे फिक्सिंग आहे, नुरा कुस्ती आहे. भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष व त्यांचे नेतृत्व विश्वगुरु असल्याचा टेंभा मिरवत असते पण हा त्यांचा दावा पोकळ आहे. भाजपामध्ये लायक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारही नाहीत, त्यांना ते विरोध पक्षातून साम, दाम, दंड, भेद, नितीचा वापर करून आणावे लागत आहेत. भाजपातील निष्ठावान कार्यकर्त्यांना फक्त सतरंजा उचलण्याचे काम ठेवले आहे. भारतीय जनता पक्ष विरोध पक्षांच्या नेत्यांना खाणारी चेटकीण आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has accused the ruling parties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न, भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी हवी’; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
1

‘संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न, भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी हवी’; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
2

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त
3

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा
4

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.