Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

वाढवण बंदर आणि मुंबई-दिल्ली महामार्गाशी जोडले जाणार आहे, अशी घोषणा करण्याबररोबरच शहराला दररोज पाणीपुरवठा आणि यंत्रमागधारकांसाठी इचलकरंजी पॅटर्न राबविणार असल्याचेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 10, 2026 | 07:53 PM
सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी 'इचलकरंजी पॅटर्न',

सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी 'इचलकरंजी पॅटर्न',

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूर शहराची लोकसंख्या २०५७ जितकी असेल त्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी दररोज देण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा महापौर झाल्यानंतर काही काळातच सोलापूरकरांना दररोज पिण्याचे पाणी देण्याचा शब्द मी देत आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सोलापूरकरांना अभिवचन दिले. हजारो सोलापूरकरांच्या गर्दीत शनिवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य विजय संकल्प सभा झाली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सोलापूर शहराला दररोज पाणी मिळण्यासाठी ८९२ कोटी रुपये निधीची योजना लवकरात लवकर पूर्ण करणे, सोलापूर शहरातील चाळींच्या पुनर्विकासाला चालना देणे, संपूर्ण शहरासाठी पिण्याचे पाणी, मलनिस्सारण प्रकल्प करणे,आवास योजनापूर्ती, अक्कलकोट रस्ता आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील सुविधांची पूर्तता यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

सोलापूरकरांचा भाजपावर प्रचंड विश्वास आहे. मध्यमवर्गीयांच्या, सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी सोलापूरचे चित्र बदलण्याकरता भाजप काम करत राहणार आहे. जिथे विमानसेवा सुरू होते तिथे उद्योग व्यापार आणि पर्यायाने रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. सोलापूर या औद्योगिक नगरीला भरभराट आणण्यासाठी विमानसेवा भाजपा सरकारने सुरू केली आहे. आगामी काळात सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगचीही सुविधा देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सोलापूरची विमानसेवा सुरू होणार नाही असे काही जण म्हणत असत. परंतु भाजपाने विमानसेवा सुरू करून दाखवली असेही त्यांनी सांगितले.

Ahilyanagar News: १७ हजारांहून अधिक लाडक्या बहिणींना वगळले! महायुती सरकारबाबत महिलांमध्ये नाराजी

सोलापूरची ओळख चादर, कडक भाकरी, हुरडा, शेंगा चटणी जशी आहे त्याचसोबत सोलापूरला आधुनिक शहराची ओळख मिळवून देण्याचे आमचे स्वप्न आहे. सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) शहरांचा ६५ टक्के वाटा आहे. परंतु गेल्या ७० वर्षांमध्ये शहराच्या सुधारणांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शहर सुधारण्याकडे देशाचे लक्ष वेधत शहरांच्या सुधारणेला प्राधान्य दिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सोलापूरवर विशेष प्रेम आहे. त्यांनी सोलापूरसाठी नाशिक – सोलापूर – अक्कलकोट असा महामार्ग मंजूर केला आहे. हा रस्ता थेट देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या वाढवण बंदराला जोडत असल्यामुळे या परिसरात औद्योगीकरणाकरता नवी इकोसिस्टीम तयार होणार आहे. तसेच हा रस्ता मुंबई – दिल्ली महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाची गती वाढणार आहे.

सोलापूर हे यंत्रमाग, विडी कामगार, विणकर आणि कामगारांचे शहर आहे. सोलापूरकरांच्या योगदानातून येथील अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. सोलापुरातील यंत्रमाग उद्योगाला उभारी देण्यासाठी इचलकरंजी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. सोलापूरच्या परिसरात श्री सिद्धरामेश्वरांसह अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर आदी तीर्थक्षेत्रे असल्यामुळे भविष्यात सोलापूर हे पर्यटनाचे इंजिन म्हणून काम करणार आहे. कमळ हे लक्ष्मीचे वाहन असून समृद्धीचे प्रतीक आहे. सोलापूरकरांनी १५ जानेवारीला कमळाची काळजी घ्यावी. १६ जानेवारीपासून तुमची काळजी देवाभाऊ घेईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना आश्वस्त केले.

महापौर भाजपचाच होणार

सोलापूरने आजवर ज्या ज्या योजना, प्रकल्प, निधी मागितले ते सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. सोलापूरचा चौफेर विकास होत आहे. सोलापूरचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे सोलापुरातील सर्व लाडक्या बहिणींसह सर्व सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी केले

रोज पाणी दिल्याशिवाय मत मागायला येणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ८९२ कोटी रुपयांची महत्त्वकांक्षी योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे संपूर्ण पाठबळ सोलापूरला आहे. त्यामुळे ही योजना लवकरच पूर्णत्वास येणार आहे. सोलापूरला दररोज पाणी दिल्याशिवाय पुन्हा मते मागायला येणार नाही, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी ठामपणे सांगितले.

Pune News: गप्प बसायचं नाही… आता! हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप; म्हणाले…

Web Title: Will connect solapur to vadhan port provide water daily and implement ichalkaranji pattern devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Nashik
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur: एसटीचा पास नाही म्हणून कंडक्टरने पाचवीतील चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवलं; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न
1

Solapur: एसटीचा पास नाही म्हणून कंडक्टरने पाचवीतील चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवलं; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो
2

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो

Maharashtra Politics: ‘लाडकी बहीण योजने’वर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; म्हणाले, “देवाभाऊ आहे तोवर…”
3

Maharashtra Politics: ‘लाडकी बहीण योजने’वर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; म्हणाले, “देवाभाऊ आहे तोवर…”

Nashik News : जावयाने सासूला 20 लाखांचा घातला गंडा असं हवंय, मुलगी-नातवाचीही साथ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
4

Nashik News : जावयाने सासूला 20 लाखांचा घातला गंडा असं हवंय, मुलगी-नातवाचीही साथ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.