mp sanjay raut on Saif Ali Khan attack news live
मुंबई : बॉलीवुडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. रात्री तीन वाजता राहत्या घरी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये वांद्रेमधील राहत्या घरामध्ये शिरलेल्या चोराने हा हल्ला केला आहे. रात्री 3 वाजता सैफ अली खानला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सैफ अली खानवर सहा वेळा वार करण्यात आले असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयामध्ये उपचार व शस्त्रक्रिया सुरु आहे. यावरुन आता राजकीय नेत्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. खासदार संजय राऊत यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संबंध जोडले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. तो मोठा कलाकार आहे. काल पंतप्रधान मुंबईत होते. सगळी सुरक्षा व्यवस्था तिथे असणार. पीएम मुंबईत असले, तरी या राज्यात काय चाललं आहे, हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:ला विचारला पाहिजे. आम्ही भाष्य केलं की त्यांना यातना होतात. महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाहीये. घरात, झोपडी, चाळीत कुठेही चोर-दरोडेखोर घुसत आहेत,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे खासदार राऊत म्हणाले की, “सैफ अली खानला स्वत:ला सुरक्षा व्यवस्था असणार. पण तिथे चोर घुसतात आणि हल्ला करतात हा मोदींना धक्का आहे. 15 दिवसांपूर्वी याच सैफ अली खानने सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. मोदींनी त्यांच्या कुटुंबासोबत एक तास घालवलेला. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला होतो. तो चोराने केला की अन्य कोणी? हा पुढचा प्रश्न. या राज्यात कोणी सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालं आहे. हे गृहमंत्र्यांनी समजून घ्यावं. राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेले आमदार, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्या संरक्षणासाठी दिले जातात. इथे सामान्य माणसाला सुरक्षा नाहीय. पण गद्दार, बेईमान आणि भ्रष्टाचाऱ्यांना सुरक्षा आहे” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या एका क्लिकवर
ही मुभा सगळ्यांना मिळणार आहे का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी नौदलाच्या मैदानावर कार्यक्रम घेतले. यावेळी त्यांनी महायुतीच्या निवडणून आलेल्या सर्व आमदारांशी संवाद साधला. यावरुन देखील खासदार राऊत यांनी निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच भाषण तुम्ही काळजीपूर्वक ऐका. महायुतीचा कालचा मेळावा नौदलाच्या जागेत झाला. भारतीय नौदलाच्या एखाद्या सभागृहात भाजप किंवा त्यांच्या समर्थक आमदारांचा मेळावा होत असेल, तर इतर पक्षांना अशी संधी मिळणार का? लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जागेत हा मेळावा होत असेल, तर ही गंभीर बाब आहे. या मेळाव्याचे पैसे कोणी भरले?. ही मुभा सगळ्यांना मिळणार आहे का? भाजपला ही संधी देत असाल तर आम्हाला सुद्धा मिळाली पाहिजे. पब्लिक प्रॉपर्टी आहे,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.