अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यामुळे खासदार सुप्रिया सुळेंकडून आरोग्याची विचारपूस करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. वांद्रेमध्ये हा मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. रात्री 3 वाजता हा प्रकार घडला आहे. अभिनेता सैफ अली खानच्या वांद्र्यातील राहत्या घरात हा चाकू हल्ला केला असून सहा वार चोराने केले आहेत. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. सैफ याच्या घरातील तीन नोकर ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सैफ अली खान यांच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे. पुण्यातून सुप्रिया सुळेंनी सैफ अली खानच्या कुटुंबियांची फोनवर चौकशी केली आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशातून काळजी व्यक्त केली आहे. सैफ अली खानवर सध्या लिलावती हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अभिनेता सैफ अली खानच्या तब्यतेची चौकशी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या एका कार्यक्रमाला आल्या होत्या. यावेळी त्यांनी सैफ अली खानची मेव्हणी अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासोबत संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे यांनी करिश्मा कपूर यांच्याकडे चौकशी केली.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सर्व ठीक आहे का? मग करिना आता रुग्णालयात आहे का? अच्छा म्हणजे तुम्ही झोपलेले असतानाही ही घटना घडली. किती धक्कादायक घटना आहे. मी काही करु की पोलीसांना तुम्ही तक्रार केली आहे आणि ते आले आहेत. मला खरंच माफ कर मी तुला इतक्या सकाळी फोन केला. मी माझ्या मतदारसंघात एका कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा मला समजलं. यानंतर मी सैफला फोन केला, त्यानंतर मी तुमच्या कुटुंबाला फोन केला पण कोणीही उचलला नाही. त्यामुळे मी तुला फोन केला”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
पुढे सुप्रिया सुळे यांनी करिश्मा कपूर यांना धीर देत कोणतीही मदत लागल्यास सांगण्यास सांगितले आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यानंतर सुप्रिया सुळेंनी करिश्मा कपूरला आई-वडिलांना (रणधीर कपूर-बबीता कपूर) इतक्या काही सांगू नकोस. तो चोर घरात कसा शिरला, किती धक्कादायक आहे. सैफ आणि करीनाची काळजी घे आणि मला काय होतंय ते कळवं. काळजी घ्या. माझी काही मदत लागली तर तेही सांग. सैफ हा घरी आहे का, तो रुग्णालयात आहे का, मग त्याची प्रकृती कशी आहे, खूप खूप प्रेम, काळजी घ्या”, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी काळजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, “मी त्यांच्या कुटुंबाशी बोलली. त्यांच्या कुटुंबियांची गोपनियता महत्त्वाची आहे. त्यांच्याकडून लवकरच अधिकृत पत्रक काढलं जाईल. पोलिसही याबद्दल सविस्तर सांगतील. याबद्दल अधिकृतरित्या सविस्तर माहिती आल्यानंतर बोलणं योग्य राहील. सैफ अली खान हे सध्या सुरक्षित आहेत. ते रुग्णालयात आहेत. त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृत माहिती आल्यानतंरच यावर बोलणं योग्य ठरेल, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.