mp sanjay raut target devendra fadnvais and nitesh rane on aaditya thackeray clean chit
मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्ष आक्रमक झाले आहेत. मराठी अस्मितेसाठी ठाकेर बंधू एकत्र येणार असल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये अमनेक घडामोडी होताना दिसत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. शासन आदेशाची होळी ठाकरे गटाकडून केली जाणार आहे. याबाबत राऊत म्हणाले की, “आम्ही या आंदोलनामध्ये सगळ्यांना आमंत्रित केलं आहे, याचा पहिला टप्पा आहे आणि महत्वाचा टप्पा आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो आदेश काढला आहे हिंदी सक्तीचा जो आदेश काढला आहे त्याची होळी करण्यात येणार आहे. यात शिवसैनिक सामील नाही तर त्या त्या जिल्ह्यातील मराठी जनता साहित्य, लेखक यांनाही आमंत्रित केलं आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आज तीन वाजता आझाद मैदानावर स्वतः शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे असणार आहेत. आज त्यासाठी तातडीची बैठक बोलवली आहे. मराठी मनगट कसं पेटलेले आहे हे आम्ही दाखविल्या शिवाय राहणार नाही. उद्या अधिवेशन आहे अधिवेशनात सुद्धा चर्चा मांडू,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच उदय सामंत यांनी त्रीसूत्री ही उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मान्य केली असून यावर तेव्हाच विरोध केला पाहिजे होता. आता राजकीय फायद्यासाठी मोर्चा काढत असल्याचा टोला उदय सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “आम्ही उदय सामंत यांच्याकडे भविष्य विचारलं नाही. ते भाकीत मुळे कसे मंत्री झाले हे माहीत आहे. जसे हिंदी सक्ती होत आहे, तसे त्यांच्यावर मोदी आणि शहा यांनी पक्ष सोडण्याची सक्ती केली. ही सक्ती पुढे शरणागती पत्करणारे उदय सामंत आणि त्यांचे सहकारी आहेत. उदय सामंत यांनी कमीत कमी बोलावं, यात त्यांच हित आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी भाषेसाठी आंदोलन करण्याच ठरवलं तेव्हा सगळं एकत्र आलेले आहे. दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये इतर संवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही. मी फक्त दोन ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी मनात नाही तर महाराष्ट्राचा आणि मराठी संघटन बाळासाहेब ठाकरे यांनी उभं केलेलं आहे. जर दोघं एकत्र येणार असतील मराठी माणूस मराठी मिडियाने देखील स्वागत केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी जो आदेश काढला त्याचे आम्ही होळी करणार आहोत. पहिला आदेश होता तर नवीन आदेश काढण्याचे काय गरज होती त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का काय बोलत आहेत नासकी बटाटे भरली आहेत का ? मी शासनात नव्हतो पण शासन कसे चालते मला माहिती आहे मी गेले 25 वर्ष शासनात आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.