
MP Sanjay Raut visit Shivtirth Displeasure on mns alliance with eknath shinde in KDMC
मुंबईसह राज्यातील मह्त्त्वाच्या पालिकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. ठाकरे बंधूंची ही दोन दशकांनंतर झालेल्या युतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले, मात्र प्रत्यक्षात याचे मतांमध्ये जास्त रुपांतर झाले नाही. ठाकरे बंधूंच्या या युतीचा फायदा राज ठाकरेंपेक्षा जास्त उद्धव ठाकरेंना झाला असल्याचे दिसून आले आहे. मात्र आता कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. तसेच ठाकरे बंधुंची युती ही फक्त निवडणूकीपुरती होती का अशी चर्चा देखील दबक्या आवाजामध्ये सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
हे देखील वाचा : हर्षवर्धन सपकाळ ‘या’ तारखेला वाराणसी दौऱ्यावर; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार
यापूर्वी खासदार राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, . कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत जो प्रकार झाला तो स्थानिक पातळीवर घेतल्या गेल्याचे समजते. तर केडीएमसीतील प्रकार हा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची भूमिका नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. राज ठाकरेंनाही हा प्रकार मान्य नाही. शह-कटशहाच्या राजकारणात नीतीमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये. याविषयी राज ठाकरे यांच्याशी अंतर्गत चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नेत्यांना जर अशी युती करायची होती, तरीही त्यांनी शिंदेसेनेसोबत अशी युती करायला नको होती असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले
हे देखील वाचा : गझनवी, खिलजी गप्प झाले पण आजही सनातनी ध्वज…; अमित शाहांचा आक्रमक पवित्रा
भाजपसोबत जाण्याचा विचार होईल पण…
पुढे शिंदे सेनेसोबत मनसेची युती होत असल्यावर नाराजी व्यक्त केली. संजय राऊत म्हणाले की, “शिंदेंच्या बाबतीत आमची ही भूमिका कडवट आणि कठोर आहे. तिथे भाजप आणि शिंदे हे एकत्र येऊन महापालिकेत सत्तेत येऊ शकतात.इतरांना त्यामध्ये घुसायचं कारण नव्हतं.” हे माझं मत असल्याचे राऊत म्हणाले. “त्यांनी हा निर्णय का घेतला हे समोर आले आहे. त्यामुळे यावर आता अंतर्गत चर्चा करू असे राऊतांनी स्पष्ट केले. KDMC मध्ये शिंदेंसोबत मनसेचा घरोब्याबाबत राज ठाकरेंनी फेरविचार करावा? का यावर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे,” असे म्हणत राऊतांनी भाष्य करणं टाळलं. ‘अस्थिरता असेल तिथे भाजपसोबत जाण्याचा विचार होईल पण शिंदेसेनेसोबत जाणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.