Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udayanraje Bhosale: “तो दिसेल त्या ठिकाणी त्याला…”; सोलापूरकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिलेल्या एका यूट्यूब मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र वाद निर्माण झाला आहे.   

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 05, 2025 | 04:59 PM
Udayanraje Bhosale: "तो दिसेल त्या ठिकाणी त्याला..."; सोलापूरकरांच्या 'त्या' वक्तव्यावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

Udayanraje Bhosale: "तो दिसेल त्या ठिकाणी त्याला..."; सोलापूरकरांच्या 'त्या' वक्तव्यावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. इतिहासामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आग्रा सुटकेबाबत त्यांनी वक्तव्य केल्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. यावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे. उदयनराजे भोसले म्हणाले, “राहुल सोलापूरकरला गोळ्याच घातल्या पाहिजेत. सोलापूरकर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला गाडा.जे लाच घेतात त्यांना काही समजत नाही. केवळ मलाच नाही शिवभक्तांना वेदना होतात. असे वक्तव्य करणाऱ्यांची जीभ हासडली गेली पाहिजे. मी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांना भेटणार आहे. अशी वक्तव्ये करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

काय होते राहुल सोलापूरकर यांचे वक्तव्ये?

मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिलेल्या एका यूट्यूब मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र वाद निर्माण झाला आहे.   शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते आणि त्यासाठी पुरावेही उपलब्ध असल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

सोलापूरकर यांनी “शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे काहीच नव्हते” असा दावा केला.  “मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून महाराजांनी सही-शिक्क्याचे पत्र घेतले होते आणि त्या परवान्याच्या आधारे महाराज आग्र्यातून बाहेर पडले.” तसेच, “स्वामी परमानंद पाच हत्तींसह आग्र्यातून बाहेर पडले होते, याचेही पुरावे उपलब्ध आहेत,” असा उल्लेख त्यांनी केला.

हेही वाचा: Rahul Solapurkar on Shivaji Maharaj: शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान; अभिनेते राहूल सोलापूरकर अडचणीत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून सोलापूरकरांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी लिहिले, “छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन सुटले, असे इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मूर्ख माणूस महाराष्ट्राला इतिहास शिकवत आहे. महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत.”

Web Title: Mp udayanraje bhosale got angry on actor rahul solapurkar about chatrapati shivaji maharaj statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप
1

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप

Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यात तरुणाचा निर्घृण खून; आठवडा बाजारातच कोयत्याने हल्ला
2

Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यात तरुणाचा निर्घृण खून; आठवडा बाजारातच कोयत्याने हल्ला

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
3

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Maharashtra Politics: ‘भाजपकडून वेळेनंतर AB फॉर्म…’; सोलापुरात जोरदार राडा
4

Maharashtra Politics: ‘भाजपकडून वेळेनंतर AB फॉर्म…’; सोलापुरात जोरदार राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.