Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

महाविकास आघाडीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापुरात मेळावा आयोजित केला होता. यावेळी मविआचे नेते आणि उमेदवार उपस्थित होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2026 | 01:32 PM
“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • लोकशाहीत निवडणुकीवरचा लोकांचा विश्वासच उडाला
  • महागाईविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा
  • जयंत पाटील यांचा भाजप सरकारवर निशाणा
सोलापूर : “आज लोकशाहीत निवडणुकीवरचा लोकांचा विश्वासच उडाला आहे, कारण मतदार याद्यांमध्येच घोळ असतो. मात्र, बॅलेट पेपरवर होणारी ही निवडणूक म्हणजे जनतेच्या मनातील रोष, महागाईचा संताप आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा असंतोष मतपेटीतून बाहेर काढण्याची सुवर्णसंधी आहे,” असा घणाघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, आमदार जयंत पाटील यांनी सोलापुरात केला. महाविकास आघाडीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील ​यांच्यासह मविआचे नेते आणि उमेदवार उपस्थित होते.

 

काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील म्हणाले, ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. हे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पुढील सात दिवस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मविआच्या उमेदवारांची योग्यता मतदारांना पटवून दिली पाहिजे.

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशाचा मूळ डीएनए हा संविधान आणि लोकशाही मानणारा आहे, पण हा डीएनए बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाचे वाटोळे करण्याचे पाप मोदी-शहा करत आहेत. ही निवडणूक केवळ पदवीधर किंवा शिक्षकांची नसून देशाच्या अस्तित्वाची आणि लोकशाहीची ज्योत अखंड ठेवण्याची लढाई आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देशात बदलाचे वारे वाहू लागले आहेत आणि या बदलाचे खरे शिलेदार आपल्याला व्हायचे आहे असे सांगून सोलापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देऊया असे आवाहन केले.

हर्षदा देशमुख-जाधव यांनी युवकांमध्ये आज प्रचंड रोष आहे. ही निवडणूक म्हणजे परिवर्तनाची नांदी असून, दडपशाही संपवून लोकशाहीचा विजय निश्चित करण्याची हीच वेळ आहे असे प्रतिपादन केले.

भाजपचा मित्रपक्षांवर अजिबात विश्वास नाही! – जयंत पाटील

​मेळाव्यात पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर अत्यंत टोकाची टीका केली. भाजपने एक यादी जाहीर केली असून, महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार जिथे आहेत, तिथेच भाजपचे आमदार-खासदार निरीक्षक म्हणून नेमले आहेत. यावरून स्पष्ट होते की भाजपचा त्यांच्याच मित्रपक्षांवर तिळमात्र विश्वास नाही, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.

हे सुद्धा वाचा : गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सतेज पाटलांनी कंबर कसली ; प्रचाराची सूत्रे हातात घेतली!

​काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सोलापुरात प्रचाराची प्रत्यक्ष धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मेळाव्यानंतर खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी व मविआच्या सर्व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष नियोजन बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत प्रचार यंत्रणेचा सखोल आढावा घेऊन प्रत्येक नेत्याला आणि पदाधिकाऱ्याला जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. जास्तीत जास्त मतदान करून मविआच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जयंत पाटील यांनी निवडणुकांबाबत काय विधान केले?

    Ans: मतदार याद्यांमधील घोळामुळे लोकांचा निवडणुकांवरील विश्वास उडाल्याचे विधान जयंत पाटील यांनी केले.

  • Que: बॅलेट पेपरवरील निवडणुकीला जयंत पाटील यांनी काय म्हटले?

    Ans: महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील जनतेचा रोष मतपेटीतून व्यक्त करण्याची सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी सांगितले.

  • Que: सोलापुरातील महामेळावा कशासाठी आयोजित करण्यात आला होता?

    Ans: महाविकास आघाडीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Jayant patil has criticized the bjp government during a maha vikas aghadi melava nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Election News
  • jayant patil
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
1

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास
2

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश
3

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश

कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे रणशिंग; जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारासाठी मेळावा
4

कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे रणशिंग; जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारासाठी मेळावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.