Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दम असेल तर या, दोघेही ईडीच्या कार्यालयात जाऊ’; उदयनराजेंचे अजित पवारांना अप्रत्यक्ष आव्हान

कोणते मंत्री-संत्री भ्रष्टाचार, खंडणीसंदर्भात काय बोलले मला माहित नाही. तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन आरोप करा. आपण दोघेही चौकशीसाठी ईडीच्या (Enforcement Directorate Office) कार्यालयात जाऊ, असे थेट आव्हान खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2022 | 06:15 PM
‘दम असेल तर या, दोघेही ईडीच्या कार्यालयात जाऊ’; उदयनराजेंचे अजित पवारांना अप्रत्यक्ष आव्हान
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : कोणते मंत्री-संत्री भ्रष्टाचार, खंडणीसंदर्भात काय बोलले मला माहित नाही. तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन आरोप करा. आपण दोघेही चौकशीसाठी ईडीच्या (Enforcement Directorate Office) कार्यालयात जाऊ, असे थेट आव्हान खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना साताऱ्यात एमआयडीसीमध्ये उद्योग का आले नाहीत? याचे कारण खंडणी मागितली जात असल्याचा आरोप करत अप्रत्यक्षपणे उदयनराजेंना टोला लगावला होता. त्याला आज उदयनराजेंनी त्यांच्या सिग्नेचर स्टाईलने कॉलर उडवत उत्तर दिले आहे.

खासदार उदयनराजे म्हणाले, माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की, तो ‘घरचा आहेर’ बोलले जाते. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोललं मला माहिती नाही. मंत्री, संत्री असतील. त्याचे मला काहीही घेणे-देणं नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी ईडीला करायला सांगा. उगाच फालतू दोन लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप करू नका.

आपली ‘स्टाईल इज स्टाईल’

एखादा चांगले काम करत असेल तर त्याने कामच करायचे नाही का, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, ‘तुम्ही काम करा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की लोक लुटारू आहात, हे एकदा ठरवा. सत्ता आज आहे आणि उद्या नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे काम आहे. ही लोक पदावरून जातात. त्यावेळी कार्यालयातील स्टाफही त्यांना ओळख देत नाही. पण आपले तसे नाही. आपली स्टाईल इज स्टाईल’, असे म्हणत त्यांनी कॉलर उडवली.

Web Title: Mp udayanraje bhosale indirectly criticizes on dy cm ajit pawar in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2022 | 06:15 PM

Topics:  

  • Enforcement Directorate
  • Udayanraje Bhosale
  • ईडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.