Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vishal Patil : ‘आमचं काय व्हायचं ते होऊ दे, तुरुंगात जायचीही तयारी; पण…’; भाजप प्रवेशाबाबत विशाल पाटलांचं मोठं विधान

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्या चर्चांचं आज विशाल पाटील यांनी खंडण केलं.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 26, 2025 | 09:09 PM
‘आमचं काय व्हायचं ते होऊ दे, तुरुंगात जायचीही तयारी; पण...’; भाजप प्रवेशाबाबत विशाल पाटलांचं मोठं विधान

‘आमचं काय व्हायचं ते होऊ दे, तुरुंगात जायचीही तयारी; पण...’; भाजप प्रवेशाबाबत विशाल पाटलांचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जयश्रीताई मदन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर ही चर्चा अधिकच गडद झाली. मात्र, अक्कलकोट येथे झालेल्या काँग्रेस मेळाव्यात विशाल पाटलांनी चंद्रकांत पाटलांची ऑफर धुडकावून लावली.

Maharashtra Politics : आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

विशाल पाटील म्हणाले, “आमचं काय व्हायचं ते होऊ दे, तुरुंगात जावं लागलं तरी बेहत्तर; पण काँग्रेस सोडायची आमची तयारी नाही.” त्यांनी चंद्रकांतदादांच्या प्रयत्नांवर थेट प्रहार करत स्पष्ट केलं की, विचारांच्या राजकारणात त्यांची निष्ठा काँग्रेसकडेच आहे.

अक्कलकोट येथील या मेळाव्याला आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार प्रणिती शिंदे, सुवर्णा मलगोंडा यांच्यासह आयोजक मल्लिकार्जून पाटील उपस्थित होते. या मंचावरून विशाल पाटलांनी भाजपवर आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

“भाजपने आमच्याच घरात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आमच्या वहिनींना पक्षात घेऊन भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली. मी अपक्ष निवडून आलो असलो तरी लोकांना सांगितलं की माझं विचारविश्व काँग्रेसचं आहे, म्हणूनच जनता माझ्या पाठीशी उभी राहिली,” असं ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “काँग्रेसचा विचार एवढा खोल आहे की, तो कोणीही सहजपणे संपवू शकत नाही. म्हणूनच अपक्ष असलो तरी काँग्रेस विचारांवर चालणारा एकमेव खासदार म्हणून मी निवडून आलो आहे. अडचणी येतील, तुरुंगातही जावं लागेल, तरी आमच्यासारखे आणखी दहा-वीस जण तयार होतील. काँग्रेससाठी आमची निष्ठा अढळ आहे.”

Ramdas Athawale : ‘ठाकरे बंधुंनी हिंदीविरोधी भूमिका घेणं योग्य नाही, मराठी भाषा ही आमची…’: रामदास आठवलेंली प्रतिक्रिया

दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांची प्रशंसा करत त्यांना “अभ्यासू पण थोडे आक्रमक” अशा शब्दांत वर्णन केलं होतं. “त्यांच्यासारख्या नेत्यानं भाजपमध्ये यायला हवं. आम्ही त्यांचं स्वागतच करू. पण त्यांनी जर गांभीर्याने विचार केला नाही, तर २०२९ साठी आम्ही आमचा उमेदवार तयार करू,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, विशाल पाटील यावर अजूनही ठाम भूमिका घेत भाजप प्रवेश नाकारत आहेत.

Web Title: Mp vishal patil big staatment on bjp joining chandrakant patilo offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 09:09 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • Vishal Patil

संबंधित बातम्या

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा
1

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
2

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत
3

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

मतदारयादी शुद्धीकरणाचा भाजपलाच लाभ, २०२९च्या निवडणुकीत मोठा फायदा होईल; खासदार धनंजय महाडिक यांचा दावा
4

मतदारयादी शुद्धीकरणाचा भाजपलाच लाभ, २०२९च्या निवडणुकीत मोठा फायदा होईल; खासदार धनंजय महाडिक यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.