Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC ST Bus : इलेक्ट्रिक बसमुळे एसटीच्या तोट्यात दिवसेंदिवस मोठी वाढ, प्रकल्प रद्द करण्याची संघटनेची मागणी

ST Bus News: आधीच तोट्यात धावणारी एसटी बस आता इलेक्ट्रिक बसमुळे एसटी आणखी तोट्यात चालली आहे. या इलेक्ट्रिक बसमुळे एसटीला प्रति किलो मीटरला सरासरी अंदाजे २८ ते ३० रुपये इतका तोटा सहन करावा लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 14, 2026 | 01:20 PM
इलेक्ट्रिक बसमुळे एसटीच्या तोट्यात दिवसेंदिवस मोठी वाढ, प्रकल्प रद्द करण्याची संघटनेची मागणी

इलेक्ट्रिक बसमुळे एसटीच्या तोट्यात दिवसेंदिवस मोठी वाढ, प्रकल्प रद्द करण्याची संघटनेची मागणी

Follow Us
Follow Us:
  • इलेक्ट्रिक बसमुळे एसटीच्या तोट्यात दिवसेंदिवस मोठी वाढ
  • प्रकल्प रद्द करण्याची संघटनेची मागणी
  • अंदाजे २८ ते ३० रुपये इतका तोटा
मुंबई : एसटी महामंडळाची लालपरी एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता कायम आर्थिक तोट्यात चालत आहे. एसटी महामंडळाने ५१५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने भाडे तत्वावर घेण्याचा करार इव्हे ट्रान्स कंपनीशी केला असून, सदर कंपनीला गाड्यांचे नवीन वेळापत्रक देऊनही अजूनही अपेक्षित बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या नसून सद्या एसटीला प्रति किलो मीटरला सरासरी अंदाजे २८ ते ३० रुपये इतका तोटा सहन करावा लागत आहे. तोट्याच्या खाईत लोटणारा हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात आला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

Matheran News : रोजचं जगणं होतंय महाग,वणव्याच्या आगीत धुमसतंय माथेरान, वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा गावकऱ्यांना त्रास

मूळ करारा प्रमाणे सदर कंपनी भाडे तत्वावर दर महिन्याला २१५ बसेस देणार होती. पण वेळेत बसेस पुरविण्यात आल्या नाहीत.तोडगा म्हणून महामंडळाने सरकारच्या मध्यस्थीने कंत्राटदार कंपनीला नवीन वेळापत्रक ठरवून दिले. तरीही कंपनीने एसटीला बसेस दिल्या नाहीत. वारंवार एसटीची फसवणूक करणाऱ्या कंपनी सोबतचा करार रद्द का करण्यात आला नाही? एसटीचे व्यवस्थापन कुणाच्या दबावाखाली आहे. असा सवालही बरगे यांनी उपस्थित केला आहे.

नवीन वेळा पत्रकाप्रमाणे सदर कंपनीने एसटीला एकूण मे २०२६ पर्यंत एकूण १२८८ बसेस उपलब्ध करून देणे गरजेचे असताना आता पर्यंत ९ मीटरच्या २६० व १२ मीटरच्या ४७८ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत .एकूण फक्त ७३८ बसेस देण्यात आल्या असून दर महिन्याला १५० बसेस उपलब्ध करून देण्याचे कबूल करूनही जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात सदर कंपनीने एसटीला एकही बस उपलब्ध करून दिली नसून महामंडळाने वारंवार पत्रे लिहूनही सदर कंपनी संपर्क साधत नसून या प्रकल्पामुळे तोटा वाढत चालल्याने महामंडळाच्या चिंतेत भर पडत आहे.दिवसेंदिवस वाढत चाललेला तोटा पहिला तर प्रकल्प पूर्ण होई पर्यंतचा संभाव्य तोटा ३२०० रुपयांवर जाणार असून त्याचा होणारा व्यवहार्यता पूरक निधी सरकारने तात्काळ उपलब्ध करून दिला नाहीतर व परिस्थती अशीच राहिली तर महामंडळ आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडेल अशी भीतीही बरगे यांनी व्यक्त केली.

डिफॉल्टर कंपनीवर सरकार मेहेरबान

सदर कंपनीने एसटीला भाडे तत्वावर दिलेल्या बसेसना प्रति बस २० लाख इतकी सबसिडी सरकार देत असून आज पर्यंत रुपये ९५ कोटी इतकी रक्कम सरकारकडून एसटीला मिळाली आहे .सदर रक्कम एसटीनेही कंपनीला लगेच दिली असून सबसिडी देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत. पण संभाव्य तोट्याची ३२०० कोटी रुपये इतकी रक्कम एसटीला देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत हा विरोधाभास असून यातून सरकारला सामान्य जनतेच्या एसटी पेक्षा पुरवठादार कंपनी महत्वाची वाटत आहे. हे दुर्दैवी असल्याचे बरगे यांनी पुढे म्हटले आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द

Web Title: Msrtc st mahamandal will be fallen in more loss atter e bus project say st workers leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Belhe Bus Stand : बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद
1

Belhe Bus Stand : बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
2

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
3

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
4

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.