Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Protest News: एसटी कामगारांचे “बोंब मारो” आंदोलन स्थगित! परिवहन मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर १०० कोटींचा हप्ता निधी मंजूर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे अर्थ खात्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ फरकासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे २४ फेब्रुवारीचे 'बोंब मारो' आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 20, 2026 | 09:19 PM
एसटी कामगारांचे "बोंब मारो" आंदोलन स्थगित (Photo Credit- X)

एसटी कामगारांचे "बोंब मारो" आंदोलन स्थगित (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • एसटी कर्मचाऱ्यांचे ‘बोंब मारो’ आंदोलन स्थगित!
  • परिवहन मंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
  • वेतनवाढीसाठी १०० कोटींचा निधी मंजूर
मुंबई (२० फेब्रुवारी): एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता न मिळाल्याने असंतोष पसरला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांचा निषेध करत “बोंब मारो” आंदोलनाची नोटीस एसटी कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आली होती. पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विशेष प्रयत्नामुळे व पुढाकारामुळे सदर निधी देण्यास अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला असून सद्या तात्पुरत्या स्वरूपात १०० कोटी रुपये इतकी रक्कम एसटीला देण्यात आली आहे.

त्यामुळे मंगळावर पासून आझाद मैदानात होणारे “बोंब मारो” आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी आज दिली आहे. सद्या तात्पुरत्या स्वरूपात १०० कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून २४ फेब्रुवारी रोजी, आझाद मैदान, मुंबई येथे होणारे “बोंब मारो” आंदोलन होणार नसल्याचे बरगे यांनी म्हटले आहे आहे.

Pratap Sarnaik : एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच,‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

१३ ऑक्टोंबर २०२५ रोजी एस एसटी महामंडळातील सर्व श्रमिक संघटनाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन २० ते २४ या कालावधीचा वेतनवाढ फरक देण्याचा अत्यंत चांगला व मोठा निर्णय घेतला. त्याच प्रमाणे समान ४८ हप्त्यात सदरची रक्कम देण्यासाठी अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांच्या भरोषावर व साक्षीने राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते. हा निधी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी एसटीकडे जमा करण्यात यावा असा पत्रव्यवहार एसटीच्या व्यवस्थापनाने अनेक वेळा केला होता.

तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा निधी उपलब्ध व्हावा यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले होते. तरीही राज्य सरकारच्या अर्थ खात्यात ही निधी मंजुरीसाठी टाळाटाळ करण्यात येत होती. वारंवार त्रुटी काढून निधी देण्यात खोडा घातला जात होता. पण आजच अर्थ खात्याचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनी १०० कोटी रुपयांच निधी उपलब्ध करून देण्यात अनुकूलता दर्शविली असून पहिल्याटप्प्यात १०० कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील ८६००० कर्मचाऱ्यांना या महिन्याचा वेतनवाढ फरक रक्कम प्रलंबित हप्ता लवकरच मिळेल अशी अपेक्षा करीत निधी मंजुरी बद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार बरगे यांनी व्यक्त केले आहेत.

लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा 

Web Title: Msrtc workers bomb maro protest called off pratap sarnaik 100 crore salary hike fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Pratap Saranaik
  • ST Workers

संबंधित बातम्या

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही
1

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही

‘लालपरी’ला बुस्टर; MSRTC मध्ये तब्बल 8,300 बसेस दाखल होणार; सरनाईक म्हणाले; आर्थिक गर्तेतून…
2

‘लालपरी’ला बुस्टर; MSRTC मध्ये तब्बल 8,300 बसेस दाखल होणार; सरनाईक म्हणाले; आर्थिक गर्तेतून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.