Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या”, एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य दिल्यानंतर, एसटी महामंडळालाही भरीव निधी द्यावा अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 11, 2026 | 03:30 PM
"महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या", एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

"महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या", एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून दर महिन्याला केवळ सवलत मूल्य प्रतिपूर्तीची रक्कम दिली जात असताना, दुसरीकडे महावितरणला मात्र कर्ज फेडण्यासाठी ३२ हजार ६७९ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम देण्याचा निर्णय सरकारने हल्लीच घेतला असून राज्य सरकारचा हा निर्णय कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला छेद देणारा आहे.एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय असा दुजाभाव न करता गोरगरिबांच्या एसटीलाही अशाच प्रकारे अर्थ सहाय्य देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

Pratap Sarnaik : शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे की, आजही खेड्यापाड्यातील सामान्य माणसाचे एसटी हेच दळणवळणाचे मुख्य साधन आहे. असे असतानाही एसटीची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. महामंडळाचा संचित तोटा १२ हजार कोटी रुपयांच्या पार गेला असून, साधारण सहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त विविध देणी थकीत आहेत. अशा कठीण प्रसंगी एसटीला सुद्धा एकवेळचा पर्याय म्हणून भरीव आर्थिक मदत केली, तरच तोट्यातील एसटी वाचू शकेल; अन्यथा हा डोलारा कोणत्याही क्षणी कोलमडून पडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सध्या एसटी महामंडळावर असलेल्या थकीत देण्यांचा आकडा धक्कादायक आहे. यामध्ये प्रामुख्याने भाडे तत्त्वावरील बसची ११० कोटी रुपयांची देणी, १४५० कोटींचा उपदान निधी व विश्वस्त मंडळ अंशदान, १४०० कोटींचे भविष्य निर्वाह निधी अंशदान व वर्गणी, तसेच ११५० कोटींचा प्रवासी कर थकीत आहे. याव्यतिरिक्त डिझेलची ११५ कोटींची देणी, ८० कोटींची भांडार खरेदी व पुरवठादार देणी, ५० कोटींची रजा रोखीकरण रक्कम, ३८ कोटींची विमा निगडित वर्गणी, ९ कोटींचा वैद्यकीय व प्रवास भत्ता आणि ५० लाख रुपयांची अपघात सहाय्यता रक्कम प्रलंबित आहे. एप्रिल १६ पासूनचा कर्मचाऱ्यांचा ११५० कोटी रुपयांचा महागाई भत्ता प्रलंबित आहे. वाढीव घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ फरकाची रक्कम सुद्धा प्रलबित असून साधारण सहा हजार कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त थकीत देणी देण्यासाठी राज्य सरकारने एकवेळचा पर्याय म्हणून एसटीला निधी उपलब्ध करून दिल्यास महामंडळाला मोठे बळ मिळेल आणि जनसामान्यांची ही जीवनवाहिनी पुन्हा एकदा सक्षमपणे उभी राहील, असा विश्वासही बरगे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप

Web Title: Msrtc workers congress demand funds st mahavitran 32000 crore aid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

पिंपरीत नवनियुक्त आयुक्तांचा ‘दणका’; अवैध बांधकामांना अभय देणाऱ्या दोन अभियंत्यांचे निलंबन
1

पिंपरीत नवनियुक्त आयुक्तांचा ‘दणका’; अवैध बांधकामांना अभय देणाऱ्या दोन अभियंत्यांचे निलंबन

Ahilyanagar News: महापालिकेच्या ‘पे अँड पार्क’ला कापड बाजार व्यापारी असोसिएशनचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा
2

Ahilyanagar News: महापालिकेच्या ‘पे अँड पार्क’ला कापड बाजार व्यापारी असोसिएशनचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
3

खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pratap Sarnaik : शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik : शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.