Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी बनवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 11, 2026 | 03:22 PM
MSRTC News, NCMC Card, Pratap Sarnaik, ST Smart Card,

MSRTC News, NCMC Card, Pratap Sarnaik, ST Smart Card,

Follow Us
Follow Us:

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने शालेय बस व वाहतूक व्यवस्थेबाबत कडक आणि सर्वसमावेशक नियमावली जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. गृह विभागाने प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, “महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६” लागू करण्याचा प्रस्ताव असून, यात सुरक्षितता, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर विशेष भर देण्यात आला आहे. या बाबतीत अधिसूचना जाहीर झालेल्या दिनांकापासून पंधरा दिवस या विहित वेळेत संबंधित संकेतस्थळावर सर्व सामान्य जनतेकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

भाडे नियंत्रणावर स्पष्ट नियम

नवीन नियमांनुसार शालेय बसचे भाडे आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित केले जाईल. विद्यार्थ्यांकडून फक्त मासिक भाडेच आकारले जाईल; एकरकमी आगाऊ रक्कम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

शेतकरी पेन्शन योजनेत जिल्हा ‘टॉप’! नोंदणी कमी असल्याने प्रशासन सक्रिय; ८ वर्षात ८० हजार शेतकऱ्यांची नोंदणी

पालकांच्या तक्रारींवर त्वरित तोडगा

प्रत्येक शाळेत स्कूल ट्रान्सपोर्ट कमिटी कार्यरत राहणार असून, ती भाडे, सुरक्षितता आणि सेवा यासंबंधी पालकांच्या तक्रारींचे निवारण करेल. तसेच तिमाही अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान अनिवार्य

सर्व शालेय बस व व्हॅनमध्ये GPS-आधारित Vehicle Location Tracking Device (VLTD) व पॅनिक बटण बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अग्निसुरक्षा यंत्रणा (FDAS), CCTV प्रणाली, तसेच सर्व सीट्ससाठी सीट बेल्टची सक्ती केली आहे.

डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली लागू

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वाहनात डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टम बसवणे आवश्यक असेल. या प्रणालीद्वारे वाहनाचे लाईव्ह ट्रॅकिंग, डिजिटल उपस्थिती नोंद, स्वयंचलित अलर्ट आणि पालकांना थेट माहिती मिळणार आहे. राज्यस्तरीय प्लॅटफॉर्मशी या प्रणालीचे एकत्रीकरणही करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या देखरेखीवर विशेष भर

प्रत्येक विद्यार्थ्याची चढ-उतार वेळेसह दैनिक उपस्थिती नोंदवणे बंधनकारक असेल. विशेषतः पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक (इयत्ता ५ वीपर्यंत) विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक प्रवासात महिला परिचारिका किंवा नियुक्त कर्मचारी असणे आवश्यक राहील.

अपंग व विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित कर्मचारी, सुलभ प्रवेश व्यवस्था आणि आवश्यक तेव्हा पालक/शिक्षक उपस्थितीची तरतूद करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची काटेकोर पडताळणी

बस चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आणि अधिकृत नियुक्तीपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व नोंदी तपासणीसाठी उपलब्ध ठेवणे बंधनकारक असेल.

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

नवीन नियम लागू झाल्यानंतर तीन महिन्यांत सर्व शालेय वाहने नियमांनुसार सुसज्ज करणे आवश्यक राहील. अन्यथा संबंधित वाहनांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

संयुक्त तपासणी यंत्रणा

शालेय वाहतुकीची नियमित तपासणी शिक्षण व परिवहन विभाग संयुक्तपणे करणार असून, त्याचे अहवाल जिल्हा पातळीवरील समितीकडे सादर केले जातील. या सुधारित नियमांमुळे शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि तंत्रज्ञानाधारित होणार असून, पालक आणि विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ होणार असल्याची भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप

Web Title: School transport safety transparency accountability maharashtra pratap sarnaik news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik
  • School

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.